सभेस नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्यासह सर्व सभापती, नगरसेवक, कर्मचारी उपस्थित होते. या अंदाजपत्रकात विकास कामे, १४ वा वित्त आयोग, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, पाणीटंचाईसाठी अधिक निधी, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, अपंग कल्याण योजना, दुर्बल घटकांसाठी ५ टक्के तरतूद करण्यात आली. तसेच समारंभ खर्च, महोत्सव खर्च, वाहन विम्यासाठी वाढीव तरतूद करण्यात आली.
शासनाकडून मिळणारे अनुदान, कर व दर फीसपासून मिळणारे अपेक्षित उत्पन्न, तरतूदी व अपेक्षित होणा-या खर्चाची माहिती लेखापालांनी सभेत दिली. औसा पालिकेने सन २०२१- २२ मध्ये कोणत्याही प्रकारच्या करात दर वाढ न करता स्थायी समितीने शिफारस केलेल्या ६ लाख ६४ हजार ६०० रुपयांच्या शिल्लकी अंदाजपत्रकास सभेने बहुमताने मंजुरी दिली.
मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, सदस्य मेहराज शेख, भरत सूर्यवंशी, मुजाहिद शेख, गोविंद जाधव, परवीन शेख, जावेद शेख, जहँआरा तत्तापुरे, नजमुनबी इनामदार, कीर्ती कांबळे, समीना सय्यद, अंगद कांबळे, मंजुषा हजारे, सुनील उटगे, उन्मेश वागदारे, गोपाळ धानुरे, शांताबाई बनसोडे, शिल्पा कुलकर्णी, रुपेश दुधनकर, सुहास डेंग यांच्यासह रोखपाल शिवकुमार हिरेमठ, लेखापाल गणेश शिंदे, अमित हेराले, सभा अधीक्षक महमूद शेख, वरिष्ठ लिपिक श्रीराम ताकभाते आदींची उपस्थिती होती. शेवटी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी आभार मानले.