येथील कोविड रुग्णालयात सोमवारी आरटीपीसीआर तपासणीत २२ बाधित आढळले. ॲन्टिजेन तपासणीत २५ कोरोना बाधित आढळले. इतर ठिकणाहून सहा रुग्णांना उपचारासाठी येथे दाखल करण्यात आले आहे. यशस्वी उपचारानंतर आठ जणांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. उपचारादरम्यान नऊ कोरोना बाधित तर दोन नॉन कोविड रुग्णांचा मृत्यू झाला.
सध्या कोविड रुग्णालयात ७२, अरुणा अभय ओसवाल संस्थेत १५, पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात १०, तोंडार पाटी येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे ३५, तोंडार पाटी येथील कोविड केअर सेंटरमध्ये ३८, जयहिंद मुलांचे वसतिगृह येथे ११, शहरातील विविध खासगी कोविड रुग्णालयात १७०, होम आयसोलेशनमध्ये ७९ अशा एकूण ४९४ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी दिली.