निलंगा : महाराष्ट्र शासनाने अचानकपणे मागासवर्गीयांच्या आरक्षणात फेरबदल करून नोकऱ्यांमधील पदोन्नतीसाठीचे आरक्षण बंद केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. राज्य शासनाच्या या धोरणावर येथील रिपाइं (आ.)च्या वतीने संताप व्यक्त करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
रिपाइं (आ.)चे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश ढेरे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. राज्य शासनाने मागासवर्गीयांसाठी पदोन्नती आरक्षण बंदचा घेतलेला निर्णय योग्य नाही. पदोन्नतीत आरक्षण कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली. शासनाने हा आदेश रद्द करावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने ७ जून रोजी सर्वच कार्यालयांवर आंदोलन करण्यात येईल, असे म्हटले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष देविदास कांबळे, तालुकाध्यक्ष संदीप कांबळे, श्रीहरी चेले, देवणी तालुकाध्यक्ष विलास वाघमारे, गणेश कांबळे, माधव सूर्यवंशी, विनोद सूर्यवंशी, अमित ढेरे, अभय ढेरे, आशिर्वाद धैर्य, निखिल धैर्य, आतिक कांबळे, आदी उपस्थित होते.