शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नात साडेसहा कोटी रुपयांची वाढ

By हरी मोकाशे | Updated: March 11, 2024 18:38 IST

व्याजातून मिळणारे उत्पन्न आता १३ कोटी ६७ लाख

लातूर : शासनाकडून मिळणाऱ्या निधीची प्रशासकांनी बँकेत योग्य पध्दतीने गुंतवणूक केल्याने व्याजाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेस व्याजातून १३ कोटी ६७ लाख रुपये मिळत आहेत. लेखा व वित्त विभागाच्या सुयोग्य नियोजनामुळे ही वाढ झाली असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विकास कामांना अधिक प्रमाणात निधी मिळणार आहे.

मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेस विविध योजना, विकास कामांसाठी केंद्र सरकार, राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीकडूनही स्थानिक विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. जिल्हा परिषदेतील पंचायत, आरोग्य, बांधकाम, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, लघु पाटबंधारे, शिक्षण, कृषी व पशुसंवर्धन, सामान्य प्रशासन अशा विविध विभागांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध निधीचा वापर जिल्हा परिषदेस दोन वर्षे करता येतो.

१२० कोटी रुपयांची गुंतवणूक...शासन व जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध निधीचा तात्काळ वापर होत नाही. तो जिल्हा परिषदेच्या बँक खात्यावर पडून राहतो. योजना अथवा विकास कामे पूर्ण झाल्यानंतर तपासणीनंतर बिल अदा करण्यात येते. त्यास काही महिन्यांचा कालावधी लागतो. या बाबी बारकाईने तपासून जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागाने तात्पुरत्या स्वरुपात बँकेत जिल्हा परिषदेच्या नावावर १२० कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे व्याजाचे उत्पन्न वाढले आहे.

अनावश्यक खाते केले बंद...जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे आणि पंचायत समित्यांचे विविध बँकेत खाते आहेत. त्यावर काही रक्कम पडून होती. लेखा व वित्त विभागाने सर्व खात्यांची आणि रकमेची माहिती घेतली. तेव्हा बरीच रक्कम वापराविना नियमित खात्यावर असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनावश्यक खाते बंद करुन ती रक्कम वापराच्या खात्यावर वर्ग करुन घेतली. बँक खात्याचे एकत्रीकरण केले आहे.

यापूर्वी ७ कोटी ३२ लाख व्याज...गेल्या वर्षी जिल्हा परिषदेस व्याजातून ७ कोटी ३२ लाख रुपयांचे व्याज मिळाले होते. खाते एकत्रिकरणामुळे यंदा त्यात ६ कोटी ५० लाखांची भर पडली असून आता १३ कोटी ६७ लाख रुपये व्याज मिळत आहे. या रकमेचा लाभ जिल्ह्यातील विकास कामांसाठी होणार आहे.

नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी उपयोग...जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या बँक खात्यावर निधी पडून असल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे बँक खात्यांचे एकत्रिकरण केले. खात्यावरील निधीची बँकेत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या नावाने गुंतवणूक केली. त्यामुळे व्याजाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. आता १३ कोटी ६७ लाख रुपये व्याजरुपाने उत्पन्न मिळणार आहे.- आप्पासाहेब चाटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद