शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

धाकधूक वाढली! लातूरमध्ये ३५० कोंबड्यांचा मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 16:56 IST

पुण्याच्या प्रयोगशाळेस वैद्यकीय नमुने पाठवले; अहवालांची प्रतीक्षा

अहमदपूर (जि. लातूर) : तालुक्यातील केंद्रेवाडी येथील ३५० गावरान कोंबड्या काल सकाळी अचानक दगावल्या. त्यामुळे नागरिकांना धास्ती बसली असून, पशुवैद्यकीय पथकाने पाहणी करून मृत कोंबड्यांचे नमुने घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. कोंबड्या कशामुळे दगावल्या, हे मात्र अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल, असे सांगितले.लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी येथील सदाशिव केंद्रे यांनी दोन महिन्यांपूर्वी अहमदनगर येथून ८०० गावरान कोंबड्यांचे पक्षी आणले होते. त्याचे संगोपन ते करत होते. दरम्यान, शनिवारी सकाळी अचानक त्यातील ३५० कोंबड्यांनी माना टाकल्या. सदरील कोंबड्या दगावल्याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी प्रभोदयमुळे घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.त्यानंतर लातूर येथील पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम, जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश कोकणे, जी.बी. पाटील घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत काही पक्ष्यांचे नमुने घेऊन पुणे येथील विषाणू संशोधन प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत.

मृत कोंबड्यांना गाडलेमयत कोंबड्यांना संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जमिनीत गाडण्यात आले, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून परिसर सील करण्यात आला आहे. आजारी व सशक्त कोंबड्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांना प्रतिजैविके व औषधोपचार करण्यात आला.

न्यूमोनिया झाल्याचा संशयकमी व उघड्या जागेमध्ये अधिक कोंबड्या असल्याने आणि थंडीमुळे न्यूमोनिया झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रयोगशाळेकडून अहवाल आल्यानंतर कोंबड्या दगावण्याचे कारण स्पष्ट होईल. इतर पक्ष्यांना बाधा होऊ नये म्हणून प्रतिजैविके दिली जाणार आहेत, तसेच शेतकऱ्याने पीपीई किट व मास्कचा वापर करावा, अशा सूचना पशुसंवर्धन विभागाने केल्या आहेत.

''अहवालानंतर कारण स्पष्ट होईल''घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली आहे. कमी जागेत अधिक कोंबड्या आहेत. नेमके कोणत्या कारणामुळे कोंबड्या दगावल्या, हे आज सांगता येणार नाही. काही नमुने घेऊन पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर कारण स्पष्ट होईल.- डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.