तालुक्यातील अलगरवाडी ग्रामपंचायतीला बावचे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ, सरपंच गोविंदराव माकणे, तंटामुक्तीचे अध्यक्ष धीरज माकणे, सुनील ढोबळे, संगमेश्वर पटणे, सुनील गायकवाड, बसवेश्वर पटणे, माधव ढोबळे, विनायक पारसे, ग्रामसेवक प्रशांत राजे आदी उपस्थित होते. यावेळी उपायुक्त बावचे म्हणाले, सरपंच गोविंदराव माकणे यांनी आपल्या व्यवसायातून वेळ काढून अल्पकाळात अलगरवाडी गावचा विकास केला. गावातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविले. बचत गटातून निर्मित झालेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून द्यावी. ग्रामपंचायतीने तरुणांसाठी उपक्रम राबवावे, असेही ते म्हणाले. यावेळी पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांनी बचत गट व गटशेतीची माहिती दिली. अलगरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसेवक प्रशांत राजे यांनी बावचे यांचा सत्कार केला.
अलगरवाडीने विकासातून गावचा चेहरा बदलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:22 IST