सृष्टी संतोष भाेंडे असे मृत दीड वर्षीय मुलीचे नाव आहे. याप्रकरणी भाद्याचे सपाेनि नाना लिंगे यांनी सांगितले, औसा तालुक्यातील आशिव येथील आरोपी संतोष गंगादास भोंडे याला दारूचे व्यसन होते. तो व्यसनच्या आहारी गेला होता. दारूसाठी तो सतत वडील गंगादास भोंडे व पत्नीशी भांडण करीत असे. त्याचबराेबर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यामुळे घरात सतत भांडण होत असे. शुक्रवारी झालेल्या भांडणात आरोपी संतोष भाेंडे याने दीड वर्षांच्या मुलीला घरातील पाण्याने भरलेल्या हौदात टाकून दिले. त्यात मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीचे वडील गंगादास भोंडे यांच्या तक्रारीवरून भादा पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस भादा पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास भादा पोलीस ठाण्याचे सपोनि नाना लिंगे हे करीत आहेत.
मद्यपी पित्याने केला दीड वर्षीय मुलीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:14 IST