अहमदपूर : येथील इनरव्हील क्लबचा २०२१-२२ या वर्षाचा पदग्रहण सोहळा येथील चामे गार्डन येथे घेण्यात आला असून नूतन अध्यक्ष, सचिव यांच्यासह इनरव्हील मेंबर्स यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.
यावेळी इनरव्हीलच्या अध्यक्षा डॉ. वर्षा भोसले यांनी मावळत्या अध्यक्षा डॉ. मीनाक्षी करकनाळे यांच्याकडून तर विजया भुसारे यांनी मावळत्या सचिव डॉ. भाग्यश्री यलमोटे याच्याकडून यांनी पिन्स प्रदान करून पदभार स्वीकारला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे, पंचायत समितीच्या माजी सभापती अयोध्याताई केंद्रे, जि.प.माजी सदस्या रेखाताई तरडे, इनरव्हीलच्या आयपीपी डॉ. मीनाक्षी करकनाळे उपस्थित होते.
तसेच नूतन आयपीपी डॉ. मीनाक्षी करकनाळे, जॉइंट सेक्रेटरी पूजा रेड्डी, उपाध्यक्ष मेघना रेड्डी, आयएसओ वैशाली चामे, ट्रेझर शीतल मालू, ईडीटर ॲड. सुवर्णा महाजन, सीसीसी अनिता जाजू या नूतन कार्यकारिणी सदस्यांनी पुढील वर्षाचा पदभार स्वीकारला. या पदग्रहण कार्यक्रमात जिल्ह्यातील नवीन क्लब झालेले उदगीर,चाकूर, औसा व नांदेड जिल्ह्यांतील लोहा, येथील इनरव्हील अध्यक्ष व मेंबर्स यासह अहमदपूर इनरव्हील क्लब मेंबर्स कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा रोडगे व कलावंती भांंताब्रे यांनी केले तर अनिता जाजू यांनी आभार मानले.