शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
4
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
5
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
6
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
7
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
8
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
9
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
10
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
11
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
12
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
13
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
14
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
15
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
16
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
17
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
18
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
19
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
20
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण

सरकारी शाळा, नोकर भरती कंत्राटीकरणाच्या विरोधात आंदोलन

By आशपाक पठाण | Updated: September 26, 2023 19:45 IST

समनक जनता पार्टीकडून लातूर-कळंब रोडवर रस्ता रोको, वाहतूक ठप्प

आशपाक पठाण, लातूर : सरकारी शाळांचे खासगीकरण व सरकारी नोकर भरती कंत्राटीकरणाचा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी समनक जनता पार्टीच्या वतीने लातूर -कळंब रोडवर काटगाव येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष जयसिंग जाधव यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनामुळे जवळपास दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.

सरकारी नोकरभरती खाजगी कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे. तसेच सरकारी शाळा खाजगी कंपन्यांना चालवायला देण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून केल्या जात आहे. हा निर्णय शासनाने तत्काळ रद्द करावा. अन्यथा समनक जनता पार्टी राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र करील. असा इशारा जिल्हाध्यक्ष जाधव यांनी यावेळी दिला. राज्यात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार तरूणांची संख्या आहे, त्यांच्या हाताला रोजगार नाही, शिक्षणाचे खाजगीकरण केल्यास सर्वसामान्यांच्या मुलांनी शिकायचे कुठे, असा प्रश्न निर्माण होईल. शाळांचे खाजगीकरण तसेच खाजगी कंपनीमार्फत होणारी नोकर भरती तत्काळ रद्द करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी राज्य शासनाच्या धाेरणाविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

यावेळी ॲड. संतोष पवार, शरद राठोड, दयानंद राठोड, बालाजी जाधव, सुनील पवार, महादेव जाधव, अक्षय चव्हाण, बळीराम जाधव, एल.टी. चव्हाण, सुरेश राठोड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनlaturलातूर