किनगाव : कोरोनाच्या संसर्गामुळे तीन महिन्यांपासून किनगावातील बुधवारचा आठवडा बाजार बंद होता. जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथील केल्याने बुधवारी हा आठवडा बाजार भरला. त्यामुळे भाजीपाला विक्रेते, छोट्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे दर बुधवारी आठवडा बाजार भरतो. कोरोनाच्या संसर्गामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे किनगावात दर बुधवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराला ग्रामपंचायतीने सुरुवात केली आहे.
यामुळे व्यवहार पूर्ववत होत आहेत. बुधवारचा आठवडा बाजार भरल्यामुळे परिसरातील भाजी उत्पादक शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला विक्रीसाठी बाजारात आणला होता. तसेच छोटे-मोठे व्यापारीही बाजारात दाखल झाले होते. त्याचबरोबर पशुधन खरेदी-विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आपली जनावरे आणली होती. बाजार सुरु झाल्यामुळे अर्थचक्र सुरु झाले आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी नागरिकांनी मास्कचा वापर करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. परंतु, काहीजण विनामास्क बाजारात आल्याचे पाहायला मिळाले.
===Photopath===
160621\20210616_141103.jpg
===Caption===
किनगाव येथे आठवडी बाजार भरला