शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

शिष्या पाठोपाठ गुरूचीही चमक! भारतीय जिम्नॅस्टीक संघाच्या प्रशिक्षकपदी लातूरच्या आशा भुसनुरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 17:08 IST

आशा भुसनुरे यांनी बंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक स्पर्धेत प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुवर्णपदक मिळवून दिले होते.

- महेश पाळणे लातूर : मल्लखांब योगासह जिम्नॅस्टिक खेळात आपल्या कौशल्याने किमया करणाऱ्या प्रशिक्षिका आशा झुंजे-भुसनुरे यांनी खेळानंतरही प्रशिक्षणाच्या माध्यमातून छाप पाडत आपली लय कायम ठेवली आहे. मंगोलीया येथे होणाऱ्या आठव्या जुनिअर व सिनिअर एशियन चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी त्यांची निवड झाली असून, या खेळात लातूरचे नैपुन्य पुन्हा सिद्ध झाले आहे. लातूरची जिम्नॅस्ट सुषमा शिंदे हिची भारतीय वरिष्ठ संघात नुकतीच निवड झाली आहे. पाठोपाठ तिची गुरू असलेल्या आशा भुसनुरे यांचीही भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्याने लातूरच्या जिम्नॅस्टिकमध्ये दुग्ध शर्करा योग साधला गेला आहे.

लातूरच्या रूद्र स्पोर्टसच्या माध्यमातून गुरू शिष्याचीजोडी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविणार आहे. १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या एशियन चॅम्पियन स्पर्धेसाठी गुरू शिष्याची ही जोडी भारतीय संधाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. त्यामुळे जिम्नॅस्टिक खेळातही लातूरचे प्रशिक्षक तथा खेळाडू पुढे जात आहेत.

राज्याला मिळवून दिले सुवर्णपदक...आशा भुसनुरे यांनी बंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक स्पर्धेत प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुवर्णपदक मिळवून दिले होते. जिल्ह्याचा गुणवंत खेळाडू पुरस्कार त्यांना यापूर्वी मिळाल आहे. यासह अनेकवेळा राष्ट्रीय व आंतरविद्यापीठ स्पर्धेत मल्लखांब, योगासह जिम्नॅस्टिक खेळात त्यांनी खेळाडू म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविले असून, त्यातील बऱ्याच खेळाडूंनी पदकही मिळविले आहेत.

क्रीडामंत्र्याची साद...जिम्नॅस्ट सुषमा शिंदे व प्रशिक्षिका आशा भुसनुरे यांच्या निवडीबद्दल क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी रविवारी दोघींचाही यथोचित सत्कार केला. यासह मंगोलिया येथील स्पर्धेसाठी आर्थिक साह्य करण्याचेही आश्वासनही त्यांनी दिले. या दोन्ही खेळाडूंना सर्वोतोपरी सहाय्य करण्याच्या सूचनाही प्रशासनाला त्यांनी दिल्या. त्यामुळे या खेळाडूंना क्रीडामंत्र्यांनी प्रोत्साहित करत साद दिली आहे.

टॅग्स :laturलातूर