शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या निधनानंतर पतीनेही सोडले प्राण! लातूर जिल्ह्यातील होळी येथील घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: May 24, 2023 23:21 IST

औसा तालुक्यातील होळी येथील रहिवासी सरस्वती सदाशिव जाधव (वय ९५) यांचे बुधवारी दुपारी २:५७ वाजता निधन झाले.

लातूर : बुधवारी सकाळी पत्नीचे निधन झाल्याचे कळताच पतीनेही त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास प्राण सोडले. ही घटना लातूर जिल्ह्यातील होळी (ता. औसा) येथे बुधवारी घडली.

औसा तालुक्यातील होळी येथील रहिवासी सरस्वती सदाशिव जाधव (वय ९५) यांचे बुधवारी दुपारी २:५७ वाजता निधन झाले. पत्नीच्या निधनाची बातमी समजताच पती सदाशिव शामराव जाधव (१०७) यांनाही धक्का बसला. पत्नीच्या निधनाच्या दु:खातच बुधवारी सायंकाळी ५:१४ वाजता त्यांनीही आपले प्राण सोडले. 

एकाच दिवशी अडीच तासाच्या आत पत्नीपाठोपाठ पतीनेही आपले प्राण सोडले आहे. दोघांच्याही पार्थिवावर गुरुवारी सकाळी ९ वाजता मूळगावी होळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुली, चार मुले, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

शेवटपर्यंत त्यांनी केला पायी प्रवास...सदाशिव जाधव यांनी शेवटपर्यंत पायी प्रवास केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेऊन ते आपल्या बाभळगाव, शिवणी आणि खरोळा येथील मुलींकडे पायीच जात होते. वाहनाने प्रवास करणे त्यांनी कायम टाळल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले.

पदरात कायम असायची भाकर!लातूर जिल्ह्यातील बाभळगाव, शिवणी आणि खरोळा गावात मुली दिल्यानंतर त्यांनी कायम त्यांच्याकडे जाताना पदरात भाकर बांधून घेतली. बाहेरचे खाणे कायम टाळले. दोघेही घरातील भाकर बांधूनच घराबाहेर पडत असत. शेवटच्या श्वासापर्यंत व्यसनापासून दूर राहत घराबाहेरील खाणे त्यांनी टाळल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूर