शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सलग २४ तास नृत्यानंतर आता १२६ तासांच्या विश्वविक्रमासाठी सृष्टी जगताप सज्ज

By संदीप शिंदे | Updated: May 20, 2023 20:35 IST

नेपाळच्या नावावरील विक्रम मोडणार; गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी लातूरची सृष्टी जगताप सज्ज

लातूर : सलग २४ तास लावणी नृत्याचा विक्रम करीत आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली लातूरची सृष्टी सुधीर जगताप ही अकरावी वर्गातील विद्यार्थींनी येणाऱ्या २९ मे ते ३ जुन दरम्यान सलग १२६ तासांपेक्षा अधिक काळ नृत्य करुन गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नेपाळच्या नावावर असणारा विश्वविक्रम मोडणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत होणाऱ्या सोहळ्यात सृष्टीच्या अनमोल भेटीची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

सृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या कल्चरल ऑलम्पियाडसाठी भारताचे नेतृत्व केले होते. त्यासाठी ती हाँगकाँग आणि दुबई येथील उत्सवात सहभागी झाली होती. यापुर्वी सृष्टीने राज्य आणि देशपातळीवर अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. वाहिन्यांवरील नृत्य स्पर्धांमध्ये महाविजेतेपद पटकाविले आहे. ती सध्या दयानंद महाविद्यालयात ११ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असून, दहावीत सीबीएसई ९९.२ टक्क्यांसह ती उत्तीर्ण झाली आहे. तिला युपीएससी स्पर्धांमधून सनदी सेवेत जायचे आहे. उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वोत्कृष्ट नृत्य कौशल्य असलेल्या सृष्टीच्या कुटूंबियांनी तिला भक्कम साथ दिली आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केली असून, तिच्या नृत्य विश्वविक्रमाचे परिक्षण गिनिज बुक यंत्रणेकडून होणार आहे. दरम्यान, तिला दयानंद संस्थेने सहा दिवसांसाठी सभागृह विनामुल्य उपलब्ध करुन दिले आहे. दरम्यान, या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जि.प. सीईओ अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांना निमंत्रित करण्यात आले असून, तिच्या विश्वविक्रमाला २९ मे रोजी सायंकाळी ६ वाजता प्रारंभ होईल.

नेपाळच्या नावावरील विक्रम मोडणार...सलग पाच दिवस नृत्याचा रेकॉर्ड नेपाळ देशाच्या नावावर आहे. त्यापुर्वी भारतातील सोनी चौरसिया यांच्या नावावर ही नोंद होती. आता सृष्टी पुन्हा हा विश्वविक्रम भारताच्या नावावर नोंदविण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी लातूरच्या दयानंद सभागृहात २९ मे ते ३ जुन या कालावधीत पाच दिवस १२६ तासांपेक्षा अधिक वेळ नृत्य करुन नेपाळचा रेकॉर्ड मोडणार असल्याचे सृष्टीने सांगितले.

टॅग्स :laturलातूरdanceनृत्यguinness book of world recordगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड