शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना योगाचे धडे
लातूर : अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्यावतीने योग दिनानिमित्त शाळा-महाविद्यालयांत योगाचे महत्त्व तसेच प्रात्यक्षिक करण्यात आले. संदीप पवार, श्रुतिकांत ठाकूर, नंदिनी धनुरे, भार्गवी देशपांडे, संदीप जाधव, अनिता संकाये, सुवर्णा आर्या, शिवाजी घोंडे, देवानंद गुजर यांनी शिबिर आयोजित करत मार्गदर्शन केले. दि. २१ ते २७ जून या कालावधीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मारवाडी राजस्थान विद्यालयात श्रमदान उपक्रम
लातूर : येथील श्री मारवाडी राजस्थान विद्यालयाच्यावतीने श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव ॲड. आशिष बाजपाई, आशिष अग्रवाल, मुख्याध्यापिका सुश्री चेतना शहा, क्रीडाशिक्षक गुरमे, बोबडे, घोडके, मुकेश बिराजदार आदींसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मैदानाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.
नेहरू युवा केंद्रातर्फे वृक्षारोपण मोहीम
लातूर : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नेहरू युवा केंद्र व इनरव्हील क्लबच्यावतीने वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोनम रेड्डी, ममता जोशी, रुपा शिरसेकर, रोहित आरदवाड, कृष्णा गिरी, सविता कुलकर्णी, संध्या चौधरी, कुसुम अग्रवाल आदींसह सदस्यांची उपस्थिती होती. यामध्ये १,५०० वृक्षांचे वाटप करून १६० रोपांची लागवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
गरजू महिलांना इनरव्हील क्लबची मदत
लातूर : वटसावित्री पौर्णिमेनिमित्त पेठ येथील महाराष्ट्र वन विभागाच्या नर्सरीमध्ये काम करणाऱ्या महिलांना इनरव्हील क्लबच्यावतीने मदत करण्यात आली. यावेळी ममता जोशी, रुपा शिरसेकर, सविता कुलकर्णी, संध्या चौधरी, कुसुम अग्रवाल, सोनम रेड्डी उपस्थित होत्या. यावेळी महिला सबलीकरण व मुलींचे शिक्षण या विषयावर संध्या चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
‘बार्टी’मार्फत वृक्षारोपणाचा उपक्रम
लातूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्यावतीने हरंगुळ एमआयडीसी परिसरात वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली. यावेळी समग्र शिक्षा अभियानाचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत ठाकरे, भगवानराव ठाकरे, जिल्हा प्रकल्प अधिकारी राजकुमार धनाशिरे, ज्योती भालेराव, सुरेखा ठाकरे, संतोष बानाटे, बाबासाहेब जवादे, बलभीम सुरवसे, आशिष भोपणीकर, सतीश ठाकरे आदींसह कामगारांची उपस्थिती होती. पर्यावरणातील प्राणवायू वाढविण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्ष लागवडीचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे चंद्रकांत ठाकरे यावेळी म्हणाले.
छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त उपक्रम
लातूर : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वसुंधरा प्रतिष्ठानच्यावतीने खाडगाव स्मशानभूमी येथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला तसेच वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अर्जुन सगर, सचिन सगर, एस. आय. मोरे, एस. आय. कांबळे, तय्यब शेख, वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. अजित चिखलीकर, राहुल माशाळकर, धनंजय मुंडे, प्रवीण कुंभार, प्रसाद कुंभार, अमोल कुलकर्णी, आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयात उपक्रम
लातूर : येथील श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. यावेळी पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, डॉ. नीलम पन्हाळे, डॉ. वर्षा दराडे, सुनीता बोरगावकर, राजश्री कांबळे, सुपर्ण जगताप, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. बी. आर. पाटील, वर्षा देशपांडे, सिंधू वाघमारे उपस्थित होत्या. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि त्याच्या संवर्धनासाठीच्या उपाययोजनेवर सगळीकडे चर्चा सुरू आहे. त्यामुळे वृक्ष संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.