लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. गुरुवारी १२३ बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुुळे बाधितांचा आलेख ८९ हजार २७२ वर पोहचला आहे. आतापर्यंत ८५ हजार ५०९ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, सद्यस्थितीत १ हजार ५४६ रुग्णांवर सुरु आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत २ हजार २१७ जणांचा मृत्यू झाला आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत गुरुवारी १ हजार २११ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ६३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर २ हजार ७७४ जणांची रॅपिड ॲन्टीजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ७० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रॅपिड ॲन्टीजन आणि प्रयोगशाळेतील चाचणी असे दोन्ही मिळून १२३ बाधित रुग्णांची भर पडली आहे. तर २२ जणांचा गुरुवारी उपचारारदरम्यान मृत्यू झाला आहे.
सद्यस्थितीत १ हजार ५४६ रुग्णांवर उपचार सुरु असून, यापैकी ७७८ रुग्ण होमआयसोलशेनमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७८ टक्क्यांवर पोहचले असून, रुग्ण दुपटीचा कालावधी २६८ दिवसांवर पाेहचला आहे. तर मृत्यूदर २.४ टक्के असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख यांनी सांगितले.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर...
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७८ टक्क्यांवर पोहचले आहे. गुरुवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने १९१ रुग्णांना रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सुटी देण्यात आली. यामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ८, सामान्य रुग्णालय उदगीर येथील १, सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल येथील ४, ग्रामीण रुग्णालय औसा ३, ग्रामीण रुग्णालय किल्लारी १, तोंडार पाटी कोविड केअर सेंटर ६, एक हजार मुला-मुलींचे वसतीगृह ८, निवासी शाळा औसा ७, कृषि पी.जी. कॉलेज चाकूर ३, खाजगी रुग्णालय २० तर हाेमआयसोलशेनमधील १२६ रुग्णांचा समावेश आहे.