दरम्यान, सध्या बाधित असलेल्या १२ हजार २७५ पैकी ८५८ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर ७४ रुग्ण असून, ३३८ रुग्ण गंभीर बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर आहेत. १९७५ रुग्ण मध्यम लक्षणाची परंतु ऑक्सिजनवर आहेत. आणि ५८९ रुग्ण मध्यम परंतु, विनाऑक्सिजनवर आहेत. ९२९९ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
प्रयोगशाळेतील चाचणीची पॉझिटिव्हिटी रेट ६.२ टक्के
रविवारी १८२७ व्यक्तींची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यात ११४ बाधित आढळले. या चाचणीतील पॉझिटिव्हिटी रेट ६.२ टक्के आहे. हा दिलासा असून रॅपिड अँटीजन टेस्ट २२२८ व्यक्तींची करण्यात आली. त्यात ५४० बाधित आढळले. या चाचणीतील पॉझिटिव्हिटी रेट २४.२ टक्के आहे.
१२४७ जणांना रुग्णालयातून सुटी
गेल्या आठ दिवसांपासून बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. रविवारीही त्यात सातत्य राहिले. बाधित ११२६ आढळले, तर कोरोनामुक्त १२४७ जण झाले. रविवारी सुटी मिळालेल्या रुग्णांमध्ये होम आयसोलेशनमधील ९४०, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील २०, ग्रामीण रुग्णालय बाभळगाव येथील २, ग्रामीण रुग्णालय जळकोट, किल्लारी येथील प्रत्येकी एक, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील १३९, तोंडार पाटी कोविड केअर सेंटरमधील ३, जयहिंद सैनिकी शाळा उदगीर येथील २, पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतनमधील ३८, समाजकल्याण हॉस्टेल कव्हा रोड येथील ३८ अशा एकूण १२४७ जणांचा समावेश आहे.