शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

लाच स्वीकारताना पोलीस,लिपिक जाळ्यात

By admin | Updated: January 5, 2017 20:45 IST

उदगीर आणि लातूर येथे गुरूवारी दुपारी वेगवेगळ्या घटनेत पोलीस कर्मचारी, लिपीकाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. 5 -  उदगीर आणि लातूर येथे आज दुपारी वेगवेगळ्या घटनेत पोलीस कर्मचारी, लिपिकाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे़ याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाणे, शिवाजीनगर पोलीस ठाणे लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे़ 
लातूर येथील घटनेत  तक्रारदार व त्यांचे मित्र अशा दोघांनी मिळून अहमदपूर येथील एमआयडीसीत व्यवसायासाठी २०१६ मध्ये प्रत्येकी १८०० स्क्वे़मिटर जागा भाडे तत्वावर घेतले होते. जागेचा भाडेपट्टा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारदाराने दस्त अभी निर्णयासाठी दाखल केला होता. त्यामध्ये स्टॅम्प ड्युटी भरून दस्त घेऊन तो एमआयडीसी कार्यालय लातूर येथे सादर करावयाचा होताय सदर दस्तासाठी लागणारे चलन तक्रारदार व त्याच्या मित्राने प्रत्येकी ५ हजार शंभर रूपये २ जानेवारी २०१७ रोजी स्टॅम्प ड्युटी भरणा केली होती़ जिल्हाधिकारी कार्यालयात चलन भरण्यात आलेली पावतीही जमा करून दस्त देण्याच्या कामासाठी कनिष्ठ लिपिक विष्णू तुळशीदास काळे याने एक हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली़ तडजोडीपोटी ठरलेली लाच आज दुपारी स्विकारताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़ याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात             गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे़ 
दुसऱ्या घटनेत उदगीर येथे तक्रारदाराकडून अटक वॉरंटमध्ये अटक न करण्याच्या कामासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयकुमार संग्राम सोळंके ( ४८, शहर पोलीस ठाणे, उदगीर) याने अडीच हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती़ दरम्यान,तडजोडीपोटी तक्रारदाराने दोन हजार रूपये देण्याचे मान्य केले.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्याकडे तक्रार दाखल केली़ या तक्रारीची दखल घेवून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बसस्थानक परिसरात गुरूवारी सापळा लावला़ दुपारी ४़३० वाजण्याच्या सुमारास तक्रारदारांकडून दोन हजार रूपयांची लाच घेताना पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयकुमार संग्राम सोळुंके याला लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडले़ याप्रकरणी शहर पोलीस ठाणे उदगीर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे़ पथकात पोलीस निरिक्षक खंदारे, पो़नि़ दराडे, पोक़ॉ़ विष्णू गंडरे, शैलेश सुडे, मोहन सुरवसे, पो़ना़ चंद्रकांत डांगे, पोक़ॉ़ नानासाहेब भोंग, सचिन धारेकर, प्रदिप स्वामी, गोविंद जाधव आदींचा सहभाग होता.