शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

लातूर जिल्ह्यातील ९५१ गावांची अंतिम पैसेवारी ४३ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 18:30 IST

लातूर तालुक्याची ३६ पैसे तर देवणी तालुक्याची ४८ पैसे आणेवारी

ठळक मुद्देपैसेवारी जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा...

- संदीप शिंदे

लातूर : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ६ लाख ५३ हजार ४७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. त्यापैकी ५ लाख ७४ हजार ९२१ हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र पावसाने सुरुवातीपासूनच पाठ फिरवल्याने पिके करपून गेली होती. महसूल विभागाच्या वतीने जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली असून, ९५१ गावांची पैसेवारी ४३ पैसे आली आहे. यामध्ये लातूर तालुक्याची ३६ पैसे सर्वात कमी तर अहमदपूर आणि देवणी तालुक्याची पैसेवारी ४८ पैसे आली आहे.

पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने गतवर्षी खरीप आणि रब्बी हंगाम हातून गेला होता. यावर्षीही खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. हंगामासाठीसोयाबीन, ज्वारी, तूर, मूग, उडीद ही प्रमुख पिके आहेत. मात्र पावसभावी पिके जळून गेली होती. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या वतीने नजर अंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये अहमदपूर तालुक्यातील १२४ गावांची पैसेवारी ५० पैश्यांपेक्षा जास्त आली होती. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ६ लाख ५३ हजार ४७ हेक्टर प्रस्तावित होते. त्यापैकी ५ लाख ७४ हजार ९२१ हेक्टरवर पेरा झाला होता. तर ७८ हजार १२६ हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडीक राहिले होते. एकूण ९५१ गावांची पैसेवारी ४३ पैसे आली आहे. त्यामध्ये लातूर तालुक्यातील १२३ गावांची ३६ पैसे, औसा १३३ गावांची ३८, रेणापूर तालुक्यातील ७६ गावांची ४०, उदगीर तालुक्यातील ९९ गावांची ४५, जळकोट तालुक्यातील ४७ गावांची ४३, चाकूर तालुक्यातील ८५ गावांची ४०, निलंगा तालुक्यातील १६२ गावांची ४७, देवणी तालुक्यातील ५४ गावांची ४८ तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ४८ गावांची ४७ पैसे आणेवारीचा समावेश आहे. महसुल विभागाच्या वतीने मंडळनिहाय पिकांची माहिती आणि उत्पादकतेची माहिती घेऊन अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. अंतिम पैसेवारी १५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली. त्यावरच पिकविमा आणि इतर गोष्टी अवलंबून राहतात. अशी माहिती महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

तीन वेळेस जाहीर होते पैसेवारी...महसूल विभागाच्या वतीने खरीप हंगामातील पिकांच्या परिस्थितीवर तीन वेळेस पैसेवारी जाहीर केली जाते. त्यामध्ये नजर अंदाज पैसेवारी, सुधारित नजर अंदाज पैसेवारी आणि अंतिम पैसेवारीचा समावेश असतो. जिल्ह्यातील दहाही तालुक्याची सरासरी ४३ पैसे आली आहे. सुरुवातील अहमदपूर तालुक्यातील १२४ गावांची पैसेवारी ५० पैश्यांपेक्षा अधिक आली होती. मात्र, पीक उत्पादनात घट झाल्याने पैसेवारी कमी झाली असल्याचे सांगण्यात आले.

पैसेवारी जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा...महसूल विभागाच्या वतीने पीक परिस्थितीनुसार पैसेवारी जाहीर करण्यात येते. सप्टेंबर, आॅक्टोबर, आणि डिसेंम्बर महिन्यातील पैसेवारीवर पीकविमा यासह अनेक बाबी अवलंबून असतात. ५० पैश्यांपेक्षा कमी पैसेवारी आल्याने शासनाकडून नुकसान भरपाईसह अन्य सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीlaturलातूर