शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कुस्तीगीरांच्या मिरवणुकीने उदगीरात क्रीडामय वातावरण; खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेला सुरुवात

By संदीप शिंदे | Updated: March 9, 2024 17:11 IST

उदगीर शहरात प्रथमच स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होत असून, ३६० खेळाडू दाखल झाले आहेत.

उदगीर : फेटे परिधान केलेले रूबाबदार कुस्तीगीर, ढोल पथक, लेझिम पथकाच्या निनादात उदगीर शहरातून काढण्यात आलेल्या कुस्तीगीरांच्या मिरवणुकीने उदगीरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते. स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेनिमित्त मिरवणूकीने उदगीर शहर कुस्तीमय झालेला अनुभव राज्यातील कुस्तीपटूंना अनुभवला.

उदगीर येथील जिल्हा परिषद मैदानावर भव्य उद्घाटन होण्यापूर्वी कुस्तीपटूंची मिरवणूक काढण्यात आली. सर्व दाखल कुस्तीगीरांची शहरात गाडीतून व घोड्यावर बसवून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लातूर येथील सदानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या ढोल पथकाने व लेझीम पथकाने सहभाग नोंदविला. या मिरवणुकीत उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी लोदगेकर, प्रा.श्याम डावळे, शेख समीर, बाळासाहेब मरलापल्ले, सय्यद जानी, शशिकांत बनसोडे, कुणाल बागबंदे, इब्राहीम देवर्जनकर, प्रदीप जोंधळे, कपील शेटकार, वसंत पाटील यांच्यासह कुस्तीगीर व कुस्तीप्रेमी नागरिक उपस्थित होते. क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी दुरदृष्य प्रणालीव्दारे मिरवणुकीचा व कुस्ती स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला. उदगीर शहरात प्रथमच स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होत असून, ३६० खेळाडू दाखल झाले आहेत. शनिवारी पंच उजळणी शिबिरानंतर कुस्तीपटूंनी वजने घेण्यात आली.

विविध वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धा रंगल्या...फ्रिस्टाईल ५७ किलो, ७० किलो, ९७ किलो, ग्रिकोरोमन ५५ किलो, ७७ किलो, १३० किलो, महिला गटाच्या ५० किलो, ५९ किलो, ७७ किलो वजनी गटाच्या लढती आज रंगल्या होत्या. राज्यातील कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर, जळगांव, रायगड, पिंपरी चिंचवड व यजमान लातूर संघ पदकांसाठी झुंज दिली. स्पर्धेसाठी ३ मॅटची कुस्ती मैदाने सज्ज झाले असून ८ हजार प्रेक्षक क्षमतेची गॅलरी उभी करण्यात आली आहे. स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्यांना अनुक्रमे ६० हजार, ५० हजार व ३०हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.

टॅग्स :laturलातूरWrestlingकुस्ती