शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Video: लातूरात चार मजली इमारतीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू

By संदीप शिंदे | Updated: October 26, 2023 10:42 IST

आज सकाळी ८.३० वाजेची घटना

लातूर : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उड्डाणपुलालगत असलेल्या एका इमारतीला गुरुवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. यात तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. या आगीमध्ये मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चार मजली इमारतीला गुरुवारी सकाळी अचानक आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने ऑटोमोबाईल आणि फोटो स्टुडिओचे मोठे नुकसान झाले. ही आग पहिला मजला, दुसरा मजला करीत चौथ्या मजल्यापर्यंत पोहचली. आगीमुळे धुराचे मोठया प्रमाणात लोट दिसून आले. स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याला दिली. पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत अग्निशमन दलास पाचारण केले. मात्र, तोपर्यंत आगीत होरपळून तिघांचा मृत्यू झाला. सुनील लोंढे, प्रमिला लोंढे, कुसूंबाबाई लोंढे अशी मृतांची नावे आहेत.

आग मोठी आल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना ती आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी तो मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद केला होता. आग आटोक्यात आणल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. या आगीच्या घटनेत नेमके किती नुकसान झाले आहे हे समजू शकले नाही. घटनास्थळी पोलिसांकडून पंचनामा सुरू असून, दुपारपर्यंत आगीचे कारण आणि झालेल्या नुकसानीचा आकडा समोर येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरFire Brigadeअग्निशमन दल