शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हलगरा येथे पुराच्या पाण्यात महिलेसह घाेडा गेला वाहून, दोघांचेही मृतदेह सापडले

By राजकुमार जोंधळे | Updated: September 6, 2022 16:57 IST

एनडीआरएफ पथकाकडून शोधमोहीम करण्यात आली असता दोघांचेही मृतदेह सापडले

औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील हलगरा शिवारात साेमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने ओढ्याला पूर आला हाेता. दरम्यान, या पुराच्या पाण्यात हलगरा येथील एक महिला व सोबत असलेला घाेडा पाण्यात वाहून गेल्याची घटना साेमवारी सांयकळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. घाेडा मृतावस्थेत साेमवारी रात्री आढळून आला. तर महिलेचा मृतदेह शाेधकार्यानंतर मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजता आढळून आला. याबाबत औराद शहाजानी पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पाेलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील हलगरा येथील रहिवासी महिला सालिया मुजायतुला माैजन (वय ४६) या शेतात गेल्या हाेत्या. दरम्यान, रविवार आणि साेमवारी झालेल्या मुसळधार पावसाने गावालगतच्या ओढ्याला माेठा पूर आला. सोमवारी सायंकळी ६ वाजण्याच्या सुमारास त्या  घाेड्यासाेबत घराकडे निघाल्या हाेत्या. दरम्यान, गावानजीक आल्यानंतर त्यांना ओढ्याच्या पुराच्या पाण्याचा अंदाज आला नाही. त्यांनी या पाण्यातून गाव गाठवण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने घाेड्यासह त्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली. गावकऱ्यांनी महिला सालिया माैजन आणि सोबतच्या वाहून गेलेल्या घाेड्याचा शाेध घेण्यास सुरुवात केली. रात्री उशिरानंतर गावकऱ्यांना मृतावस्थेत घाेडा आढळून आला.

रात्र झाल्याने शाेधकार्यात अडथळा...साेमवारी रात्र झाल्याने शाेधकार्यात अडथळला आला. पुन्हा मंगळवारी सकाळपासून पाेलीस पथक आणि एनडीआरएफच्या पथकाने शाेधकार्य सुरु केले. हलगरा शिवारात ओढ्याकाठच्या गाळात सालिया माैजन यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन हलगरा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात करुन, ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत औराद शहाजानी पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती पाेलीस हेड काॅन्स्टेबल लतिफ साैदागर, विश्वनाथ डाेंगरे यांनी दिली.

टॅग्स :laturलातूरdrowningपाण्यात बुडणे