शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उच्च शिक्षित ग्रामपंचायत सदस्याने मराठा आरक्षणासाठी उचलले टोकाचे पाऊल

By संदीप शिंदे | Updated: October 28, 2023 17:30 IST

अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील घटना

किनगाव : अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य असलेल्या एका २६ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाने 'दुष्काळ जगू देत नाही व आरक्षण शिक्षण घेऊ देत नाही' असे म्हणत विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २८ ऑक्टोबर रोजी घडली. याबाबत किनगाव पोलिसात आकस्मात मूत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य महेश बाबुराव कदम (वय २६) या तरुणाने मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने फार मोठे नुकसान होत आहे. मराठवाड्यामध्ये सातत्याने पडणारा दुष्काळ व आरक्षणाअभावी फीस भरणे शक्य नसल्याने दुष्काळ जगू देत नाही व आरक्षण शिक्षण घेऊ देत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवत शनिवारी दुपारी १२.३० वाजता विषारी औषध प्राशन केले. त्यास उपचारासाठी अंधोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. महेश कदम यांच्या पश्चात पश्चात आई, वडील, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार असून, ढाळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

एमए बीएडचे झाले होते शिक्षण...मयत महेश कदम यांनी मराठी आणि राज्यशास्त्र या दोन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. तसेच डीएड आणि बीएड या दोन्ही पदव्या घेतल्या होत्या. नोकरीसाठी प्रयत्नही केले. मात्र, यश आले नव्हते. ग्रामपंचायत निवडणूकीत विजय मिळवून ते सदस्य झाले. उच्चशिक्षित असूनही संधी मिळत नाही याचे शल्य त्यांच्या मनात होते. मराठा आरक्षण असते तर कोठेतरी संधी मिळाली असती, अशी त्यांची भावना होती, असे नातेवाईकांनी बोलून दाखविले.

टॅग्स :laturलातूरMaratha Reservationमराठा आरक्षणgram panchayatग्राम पंचायत