तीन हजार अनधिकृत नळ...
शहरात ५५ हजार ६०० अधिकृत नळधारक आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठ्याचे नियोजन मनपाकडे आल्यानंतर अनेक नळ कनेक्शन १० हजार २०० रुपयांचा दंड आकारून अधिकृत करण्यात आले आहेत. आणखी तीन हजारांच्या आसपास अनधिकृत नळ कनेक्शन आहेत.
जुन्या वसाहतीमध्ये गळती...
शहरातील नव्या वस्त्यांमध्ये नवीन पाईपालईन आहे. त्यामुळे पाण्याची गळती नाही. जुन्या वस्त्यांमध्येही नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे. परिणामी, गळतीचे प्रमाण शहरात कमी आहे. अमृत योजनेअंतर्गत जलवाहिनीचे काम बऱ्यापैकी झाले आहे. याउपरही कुठे गळती असल्यास ती तत्काळ दुरुस्ती केली जाते. त्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण नगण्यच आहे.
पाणीपट्टी थकीत...
लॉकडाऊनमध्ये मार्च २०२० पासून पाणीपट्टीची वसुली करण्यात आलेली नाही. शिवाय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पाणीपुरवठा असताना २०१० पासून पाणीपट्टी थकीत आहे. २०१५ पासून मनपाकडे पाणीपुरवठा आला आहे. पूर्वीची आणि आताची मिळून ६९ कोटींची थकबाकी आहे.
अन्यथा दंडात्मक कारवाई...
पाणीपट्टीच्या वसुलीसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. अनधिकृत नळ कनेक्शनचा शोध घेण्यात येत आहे. अनधिकृत नळधारकांनी शुल्क भरून नळ कनेक्शन अधिकृत करावे, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल. - नागनाथ कलवले, पाणीपुरवठा अभियंता मनपा