शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

जिल्ह्यात ६९५.५३३ दलघमी पाणीसाठा; गतवर्षीपेक्षा यंदा ३४८.८३४ दलघमी पाणीसाठा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST

लातूर जिल्ह्यात एकूण १४२ प्रकल्प आहेत. त्यात दोन मोठ्या प्रकल्पांचा समावेश असून ८ मध्यम प्रकल्प आणि १३२ लघु प्रकल्प ...

लातूर जिल्ह्यात एकूण १४२ प्रकल्प आहेत. त्यात दोन मोठ्या प्रकल्पांचा समावेश असून ८ मध्यम प्रकल्प आणि १३२ लघु प्रकल्प आहेत. मांजर आणि तेरणा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. त्यातील मांजरा ९० टक्के भरला आहे. या प्रकल्पावर शहराचा पाणीपुरवठा आणि सिंचन क्षेत्र मोठे आहे. हा प्रकल्प भरल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. आठ मध्यम प्रकल्पांपैकी रेणा, तिरू, देवर्जन, साकोळ हे चार मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. घरणी आणि व्हट्टी हे दोन्ही प्रकल्प भरत आले आहेत. मसलगा प्रकल्पात ६० टक्क्यांच्यावर पाणी आले आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये ७७.४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर लघु प्रकल्पांमध्ये, ६७.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सध्या जिल्ह्यात ६९५.५३३ दलघमी पाणीसाठा असून त्यातील उपयुक्त पाणी ५११.७११ दलघमी आहे. जवळपास ७३.५७ टक्के उपयुक्त पाणीसाठा जिल्ह्यात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून सिंचनाचाही जवळपास प्रश्न सुटलेला आहे.

अशी आहे उपलब्ध पाण्याची टक्केवारी.....

मध्यम प्रकल्पांमध्ये ७७.४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, लघु प्रकल्पांमध्ये ६७.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

१४२ प्रकल्पांपैकी २५ प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. तर १९ प्रकल्पांमध्ये ५० ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. १५ प्रकल्पामध्ये २५ ते ५० टक्के पाणीसाठा असून, २० प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा झाला आहे. तर ८ प्रकल्प अत्यल्प पाणी साठ्यात आहेत.

तालुकानिहाय आतापर्यंत झालेला पाऊस...

जिल्ह्यात आतापर्यंत ७२४८ मि. मी. पाऊस झाला असून गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत फक्त ५४६ मी.मी. पाऊस झाला होता. यंदा दोनशे मि. मी. पाऊस अधिक झाला आहे. लातूर ७१४.१, औसा ६७७.८, अहमदपूर ८२६, निलंगा ६१४.४, उदगीर ७९८.८, चाकूर ७३२.५, रेणापूर ८०६.९, देवणी ६५३.५, शिरूर अनंतपाळ ७७५.२, जळकोट तालुक्यात ८५३.२ मि. मी. पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे पाणीसाठा झाला आहे. खरिपाची पेरणी यामुळे यंदा वेळेत होणार आहे. सोयाबीनला सध्या मिळत असलेला भाव असाच पुढील एक ते दोन महिने राहिल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल. त्यासाठी सोयाबीनचा दर असाच स्थिर राहणे आवश्यक आहे.