शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६७ केएल ऑक्सिजन साठवण क्षमता

By हणमंत गायकवाड | Updated: December 27, 2023 18:12 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क, दररोज 950 लिटर ऑक्सिजनची होतो तयार

लातूर : राज्यात काही ठिकाणी कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळल्याने शासनाच्या निर्देशानुसार विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाची यंत्रणा सतर्क झाली आहे. ऑक्सीजन बेड, औषधी व अन्य यंत्रसामग्री सज्ज करण्यात आली असून कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी महाविद्यालय व रुग्णालय तयार आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६७ केएल. ऑक्सिजन साठवणूक क्षमता आहे. याशिवाय दररोज रुग्णालयातच ९५० लिटर ऑक्सिजन निर्मिती करण्याचेही काम सुरू आहे.

मागे कोरोना काळामध्ये ऑक्सिजन बेड आणि ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे अनेक रुग्ण व नातेवाईकांची मोठी गैरसोय लातूर शहरांमध्ये झाली होती. आता नव्या व्हेरिंटचे काही भागात काही रुग्ण आढळले असल्याचे निदर्शनास आल्याने राज्य शासनाकडून सर्व आरोग्य संस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून यंत्रसामुग्री तयार ठेवण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन साठवणूक क्षमतेसह औषधी आणि अन्यबाबी तयार केल्या आहेत.

दररोज आर्टिफिशियल चाचण्या परंतु कोरोना निरंक...राज्यात काही भागात कोरोना रुग्ण आढळले असल्याने व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांची कोरोना चाचणी केली जात आहे. पहिल्या लाटेपासून प्रयोगशाळा सुरूच असून दररोज चाचण्या केल्या जात आहेत. मात्र गेल्या एक दीड वर्षांपासून एकही रुग्ण आढळलेला नाही. गेल्या पाच सहा दिवसांपासून चाचण्यांचे थोडे प्रमाण वाढविल्या असून त्यातही रुग्ण आढळलेले नाहीत तरीपण शासनाच्या सूचनेनुसार खबरदारी म्हणून सर्व तयारी करण्यात आली आहे.

- डॉ. सचिन जाधव, वैद्यकीय अधिक्षक, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ऑक्सिजन साठवणुकीचे एकूण पाच टॅंक आहेत. दोन टॅंक मध्ये प्रत्येकी २१ केएल तर दुसऱ्या दोन मध्ये प्रत्येकी १० केएल, पहिल्या जुन्या टॅंकमध्ये ६ केएल ऑक्सीजन साठविण्याची क्षमता आहे. त्यामुळे कितीही गरज लागली तरी ऑक्सिजनची कमतरता आता भासणार नाही. चे महाविद्यालय व रुग्णालयात एकूण ६७ केएल ऑक्सिजन साठवण्याची क्षमता आहे.

ऑक्सीजन निर्मिती होत असल्याने स्वयंपूर्ण...विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दवाखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट आहेत. जिल्ह्यातल्या लागणाऱ्या दवाखान्यांना इथेच ऑक्सिजन तयार होत असल्यामुळे ऑक्सिजन बाबत लातूरचा शासकीय आरोग्य विभाग स्वयंपूर्ण झालेला आहे. शिवाय, लिक्विड ऑक्सिजन साठविण्याची क्षमताही आरोग्य विभागाने वाढविली आहे. त्यामुळे कितीही मोठी आपत्ती आली तरी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.

टॅग्स :laturलातूरcorona virusकोरोना वायरस बातम्या