लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी ६ हजार ६२९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. शुक्रवारीही सोयाबीनला विक्रमी भाव मिळाला आहे. दोन दिवसांत २०० रुपयांची वाढ झाली आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीर, देवणी बाजार समितीतही सोयाबीनला विक्रमी भाव मिळाला आहे. त्यापाठोपाठ लातूरच्या बाजारपेठेतही प्रति क्विंटल कमाल भाव ६ हजार ६८१ रुपयांचा आहे. किमान भाव ६ हजार १०० तर सर्वसाधारण भाव ६ हजार ५०० रुपयांचा आहे. शुक्रवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण ६ हजार ६२९ क्विंटलची आवक झाली. त्यापाठोपाठ गूळ ६५० क्विंटल, गहू १ हजार २४७, ज्वारी ३९, रबी ज्वारी २०४, हरभरा १३ हजार ३८७ क्विंटलची आवक झाली, तर तूर ३ हजार ४३८, करडई २८७, चिंच १ हजार ८४६ क्विंटलची आवक झाली आहे. लातूरमध्ये हरभऱ्याला कमाल भाव ५ हजार ४०० रुपयांचा मिळाला. किमान ४ हजार ९०० आणि सर्वसाधारण ५ हजार ५० रुपयांचा भाव आहे.
तुरीला कमाल ७ हजार १००, किमान ६ हजार ७८०, सर्वसाधारण ६ हजार ९१० रुपयांचा दर आहे.
चिंच प्रति क्विंटल कमाल भाव ८ हजार ५०० रुपये, तर किमान ६ हजार १०१ आणि सर्वसाधारण ७ हजार ३४० रुपयांचा भाव आहे. रबी ज्वारी कमाल भाव २ हजार ५००, किमान १९०० आणि सर्वसाधारण २ हजार रुपये दर आहे. गव्हाला प्रति क्विंटल कमाल दर २ हजार ४५०, किमान १ हजार ८०० आणि सर्वसाधारण २ हजार २०० रुपयांचा भाव मिळाला आहे. लातूरच्या बाजारात ९३३ क्विंटल चिंचोक्याची आवक झाली आहे.