शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बँक कर्मचा-यांचा संप; कोट्यवधींचे व्यवहार ठप्प, लातूर जिल्ह्यातील ६५० कर्मचारी संपात सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 19:55 IST

सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशातील १० केंद्रीय कामगार संघटनांनी ८ व ९ जानेवारी रोजी राष्ट्रव्यापी संप पुकारला आहे.

लातूर - सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशातील १० केंद्रीय कामगार संघटनांनी ८ व ९ जानेवारी रोजी राष्ट्रव्यापी संप पुकारला आहे. या संपात लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांत कार्यरत असलेल्या ६५० कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला. परिणामी, मंगळवारी जवळपास १५० कोटींचा व्यवहार ठप्प झाला. आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने देशभरात कामगारांनी संप पुकारला आहे. या आंदोलनात बँक कर्मचारीही सहभागी आहेत. लातूर शहरातील बँक आॅफ महाराष्ट्रच्या मुख्य शाखेसमोर बँक कर्मचाºयांनी मंगळवारी निदर्शने केली. यावेळी कॉ. धनंजय कुलकर्णी म्हणाले, सरकारचे आर्थिक त्याचबरोबर कामगार विषयक धोरण चुकीचे आहे. सध्या बँकिंग उद्योगांचे खाजगीकरण करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. बँक एकत्रिकरणाच्या माध्यमातून सरकार आपले एकत्रिकरणाचे धोरण राबवीत आहे. याशिवाय, सरकारचा आर्थिक निर्णय निश्चलीकरण, जीएसटी, एफआरडीआय विधेयकामुळे बँकिंग उद्योगात अस्थिरतेचे वातावरण आहे.बँकिंगमधल्या रिक्त जागांवर कर्मचा-यांची भरती केली जात नाही. सरकार नोकर भरती करण्याऐवजी प्रत्येक काम कंत्राटी पद्धतीने करवून घेत आहे. त्यामुळे हजारो जागा रिक्त आहेत. त्या भरण्यात याव्यात, यासह अन्य विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामगार, बँक कर्मचाºयांनी दोन दिवसीय राष्ट्रव्यापी संप पुकारला आहे. यावेळी कॉ. प्रशांत धामणगावकर, उत्तम होळीकर, महेश गंधले, सचिन एकुरगे, प्रकाश जोशी, आदित्य देशपांडे, परमेश्वर बडगिरे, प्रणाली मेश्राम, राधिका मुंदडा, महेश घोडके, गजानन औटी, रोहित पेंडसे, श्रीकृष्ण मांडे आदींसह विविध संघटनेचे कर्मचारी, कामगार उपस्थित होते. व्यवहारावर परिणाम... देशातील दहा केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसीय देशव्यापी संपामुळे बँकिंग व्यवहारावर परिणाम झाला आहे. या दोन दिवसांत सरासरी ३०० कोटींची उलाढाल ठप्प होईल, अशी माहिती कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी दिली. 

 

टॅग्स :bankबँक