शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६३ टक्के पाऊस; प्रकल्पांत मात्र पाणी दिसेना!

By हरी मोकाशे | Updated: July 27, 2024 19:05 IST

आठपैकी सहा मध्यम प्रकल्पांत २०.४० टक्के उपयुक्त पाणी

लातूर : पावसाळ्यातील पावणेदाेन महिन्यांच्या कालावधीत आतापर्यंत सरासरी ४४४.२ मिमी पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत ६२.९१ टक्के पाऊस झाल्याने दिलासा मिळाला असला, तरी प्रत्यक्षात आठपैकी सहा मध्यम प्रकल्पांत २०.४०, तर १३४ लघुप्रकल्पांत केवळ १८.२० टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे प्रकल्पांना दमदार वरुणराजाची आस कायम लागून आहे.

जिल्ह्यात यंदा मृगाच्या प्रारंभी दमदार पाऊस झाला. त्यानंतर आर्द्राने उघडीप देत चिंता वाढविली होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पुनवर्सूमध्ये सतत रिमझिम पाऊस झाला. त्यानंतरच्या पुष्य नक्षत्राने मोठा दिलासा दिला. त्यामुळे प्रकल्पांत पाणी येण्यास सुरुवात झाली. परिणामी, आशा वाढल्या आहेत. जिल्ह्यात सरासरी ७०६ मिमी पाऊस अपेक्षित आहे. आतापर्यंत ४४४.२ मिमी पाऊस झाला असून, तो ६२.९१ टक्के आहे. पावसामुळे पिके चांगली बहरली असली तरी जलसाठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

व्हटी प्रकल्प आला जिवंत साठ्यात...जिल्ह्यातील आठपैकी तावरजा, व्हटी आणि तिरू मध्यम प्रकल्पांत शून्य पाणीसाठा होता. दोन दिवसांपूर्वीच्या पावसामुळे व्हटी प्रकल्प जिवंत साठ्यात आला असून, १६.९६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. रेणापूर प्रकल्पात ५२.५१, देवर्जन- ३.८०, साकोळ- ३.११, घरणी- १३.१६, मसलगा प्रकल्पात ६६.३४ टक्के जलसाठा झाला आहे. सहा मध्यम प्रकल्पांत २०.४० टक्के साठा झाला आहे. तावरजा आणि तिरू प्रकल्पात अद्यापही उपयुक्त पाणी नाही.

रेणापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस...तालुका - पाऊस (मिमी)लातूर - ४५१.७औसा - ४५७.१अहमदपूर - ५२३.९निलंगा - ४३०.२उदगीर - ३९१.४चाकूर - ४६३.४रेणापूर - ५३६.७देवणी - ३४४.७शिरूर अनं. - ३५९.४जळकोट - ३९७.५

मांजरा प्रकल्पात ०.७७ टक्के उपयुक्त पाणी...लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव येथील मांजरा प्रकल्प क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्प जिवंत साठ्यात आला आहे. सध्या १.३६६ दलघमी उपयुक्त साठा असून, ०.७७ अशी उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी आहे. तसेच निलंगा, औशाची तहान भागविणाऱ्या माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात २७.६० टक्के उपयुक्त साठा झाला आहे.

४७ लघुप्रकल्प जोत्याखाली...जिल्ह्यात एकूण १३४ लघु प्रकल्प आहेत. त्यापैकी ४७ प्रकल्पांतील साठा जोत्याखाली आहे. तीन प्रकल्प कोरडे आहेत. त्यामुळे मोठा पाऊस होणे गरजेचे आहे. या लघुप्रकल्पांत केवळ १८.२० टक्के जलसाठा झाला आहे.

लघुप्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा...तालुका - लघुप्रकल्प - साठा (टक्के)निलंगा - ११ - २३.२१अहमदपूर - २७ - २२.८२रेणापूर - ६- ३७.८१चाकूर - २० - ८.१९देवणी - ११ - १२.४७लातूर - ५ - २८.१०औसा - १४ - १.२६उदगीर - १० - ३०.५९जळकोट - १० - १६.५५शिरूर अनं. - १ - ००

टॅग्स :laturलातूरRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र