दुकाने सुरूच राहावीत...
शहरातील व्यापारी नियमांचे पालन करीत आहेत. दुकाने सुरू राहिली पाहिजेत, ही सर्वांची भूमिका असून, अर्थव्यवहार सुरळीत राहण्यासाठी आवश्यक आहे. मात्र बाहेर पडणाऱ्यांनी नियमांचे पालन केले पाहिजे. विनामास्क फिरू नये. ज्यामुळे रुग्णसंख्या वाढून पुन्हा व्यवहारावर परिणाम होऊ नये, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
मुख्य बाजारपेठेत बॅरिकेड्स...
गंजगोलाईला जोडणाऱ्या सर्व अरुंद रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहनतळाची व्यवस्था नाही. पार्किंगची शिस्त नाही. त्यामुळे पाच-पन्नास वाहनधारकांमुळेही रस्ते बंद होत आहेत. परिणामी, काही ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्याची गरज आहे.
लसीकरण झालेल्यांनी जबाबदारीने वागावे
ज्यांचे लसीकरण झाले आहे, त्यांनी अधिक जबाबदारीने वागावे. सदैव मास्क वापरावा. त्यांना सौम्य संसर्ग झाला तर कळणारही नाही. परिणामी, घरातील लहान मुलांचा जीव धोक्यात जाऊ शकतो. साथ आटोक्यात राहण्याऐवजी गतीने वाढेल. त्यासाठी सर्वांनीच मास्क वापरणे अनिवार्य असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.