शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपूरच्या राळगा शिवारातून ६० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त

By संदीप शिंदे | Updated: May 15, 2023 19:46 IST

या वाळूचा लवकरच लिलाव होईल, असे महसूल विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

अहमदपूर : महसूल विभागाच्या वतीने तालुक्यातील राळगा शिवारातील ६० ब्रास अवैध वाळूचा साठा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी व नायब तहसीलदार गोविंद पेद्देवाड त्यांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आला. या जप्तीने वाळू वाहतूक व साठेबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

तालुक्यातील राळगा या गावातील गट क्रमांक १६३ व १६५ या दोन शिवारांत वाळू साठविल्याचे १२ मे रोजी कळाल्याने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रसाद कुलकर्णी व नायब तहसीलदार गोविंद पेद्देवाड यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी धाड टाकून अवैध साठवणूक केलेली वाळू जप्त केली. ही वाळू महसूल विभागाच्या वतीने अहमदपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानात आणून ठेवली आहे. या वाळूचा लवकरच लिलाव होईल, असे महसूल विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

या कारवाईत मंडळ अधिकारी नागनाथ कवठे, तलाठी महेश गुंपिले, तलाठी प्रशांत बिराजदार, तलाठी संतोष खोमणे, मंडळ अधिकारी विशाल केंचे, तलाठी माधव जोशी, तलाठी नवनीत जामनिक, तलाठी दिंगाबर मेंडके, सिद्धार्थ कांबळे, आकाश कंधारकर, गोपाळ कासले, पोलिस कर्मचारी गाडे, पोलिस कर्मचारी आरदवाड यांचा सहभाग होता. अवैध वाळू वाहतुकीवर बंदी असतानाही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक व साठवणूक होते. वाळू विक्रीचा व्यवसाय हा रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात होतो. वाळू वाहतूक व साठवणूक यावर प्रशासनाची नजर आहे. तालुक्यात वाळूउपसा, वाहतूक किंवा साठवणूक होत असल्यास महसूल विभागास कळवून सहकार्य करावे, असेही महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

वाळूचोरीविरोधात प्रशासनाची मोहीम...लातूर जिल्ह्यातील अहमदपूर व निलंगा या दोन तालुक्यांत मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जातो. याबाबत वृत्तही प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शुक्रवारी राळगा शिवारात कारवाई करीत ६० ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त केला आहे. दरम्यान, तहसील प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे वाळू चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. आगामी काळातही कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर