शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चापोलीतील ५१ शेतकरी कर्ज मुक्तीच्या प्रतीक्षेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST

चापोली : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली जात आहे. योजनेला दीड वर्ष होत आले ...

चापोली : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली जात आहे. योजनेला दीड वर्ष होत आले असले तरी चापोली येथील ५१ शेतकरी कर्जमुक्ती पासून वंचित आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. त्यात २ लाख रुपयांपर्यंत थकीत असलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज या मर्यादा आणि १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ अशी कालमर्यादा ठेवण्यात आली. कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट भरणार होते. राष्ट्रीयीकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती बँका, ग्रामीण बँका, विविध सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्जाची माफी होणार होती. प्रसिद्ध झालेल्या यादीपैकी चापोलीसह परिसरातील जिल्हा मध्यवर्ती बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक यामध्ये ३९६ शेतकरी पात्र आहेत. त्यात ३४५ थकबाकीदार पात्र होते. त्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमुक्तीचे १ कोटी ५९ लाख ५७ हजार २६० रुपये जमा झाले आहेत. त्यातील ३७६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले. तर, २० शेतकऱ्यांनी केले नाही. पात्र ५१ थकबाकीदार शेतकरी हे कर्जमुक्तीसाठी पात्र असूनही अद्यापही त्यांच्या खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा झालेली नाही. २७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले असून, कर्जमुक्तीची रक्कम अद्यापपर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही.

प्रोत्साहनपर अनुदान कधी मिळणार...

राज्य शासनाने २ लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची घोषणा केली. मात्र, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार असल्याचे घोषित केले. दीड वर्ष उलटूनही नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या चापोलीसह परिसरातील ७४५ शेतकऱ्यांच्या हातात दमडीही पडली नाही. त्यामुळे नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ठेंगा दाखवला असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

अजूनही कर्जमुक्ती मिळण्याची प्रतीक्षा...

कर्जमुक्ती साठी प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये नाव होते. आधार प्रमाणीकरणही केले. मात्र, राज्य शासनाकडून पीक कर्जमुक्तीची रक्कम बँक कर्ज खात्यात अद्यापही जमा झालेली नाही. कर्जमुक्तीच्या योजनेच्या घोषणेला दोन वर्षे होत आले तरीही अजून कर्जमुक्ती झालेली नाही. त्यामुळे कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत.

- बाबूराव तरगुडे, शेतकरी