शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

४९ हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्रोत्साहनपर अनुदान, युनिक नंबर बँकेत दाखवावा लागणार

By संदीप शिंदे | Updated: October 12, 2022 18:30 IST

२०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन आर्थिक वर्षांपैकी दोन वर्षे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

लातूर : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या ४९ हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्पात प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात याेजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक एस.आर. नाईकवाडी यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.

२०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन आर्थिक वर्षांपैकी दोन वर्षे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार अध्यादेश निर्गिमित करण्यात आला. सर्वच बँकांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड केल्या आहेत. त्यानुसार पहिली यादी बुधवारी रात्री प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामध्ये ४९ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार असून, यादीतील शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक दिला जाणार आहे. हा क्रमांक संबधित बँकेत देऊन आधार पडताळणी व कर्ज रकमेची खात्री करावी लागणार आहे. शेतकऱ्यांची संमती आल्यावर प्रोत्साहनपर अनुदान बचत खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचेही उपनिबंधक एस.आर. नाईकवाडी यांनी सांगितले. पत्रपरिषदेस सहायक निबंधक उमेश पवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनंत कसबे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जनरल मॅनेजर सी.एन. उगिले, नोडल ऑफीसर विजय हरिदास यांची उपस्थिती होती.

तक्रार निवारणासाठी समिती गठीत...विशिष्ट क्रमांक मिळाल्यावर बँकेत जाऊन कर्जाची रक्कम व आधार क्रमांक पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या संमतीनंतरच अनुदान खात्यावर वर्ग होईल. दरम्यान, कर्ज रकमेत तफावत असल्यास संबधित शेतकऱ्यांस तालुकास्तरावर तहसीलदार तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करता येणार आहे.

जिल्हा बँकेचे १ लाख ६३ हजार लाभार्थी...प्रोत्साहनपर अनुदानासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे १ लाख ६३ हजार लाभार्थी पात्र ठरलेले आहेत. तीन ते चार टप्प्यात या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकानीही त्यांच्याकडील पात्र शेतकऱ्यांची नावे शासनाच्या पोर्टलवर कळविली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सर्वच बँका मिळून ४९ हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर होत आहे.

जिल्ह्याला मिळणार ४०० कोटी रुपये...नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. यामध्ये २०१८ ते २०२० या आर्थिक वर्षांचा समावेश आहे. दरम्यान जिल्हा बँकेचे १ लाख ६३ हजार पात्र शेतकरी आहेत. तर राष्ट्रीयीकृत बँकेच्या पात्र शेतकऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. सर्वच टप्पे मिळून ३५० ते ४०० कोटी रुपये प्रोत्साहनपर अनुदानासाठी जिल्ह्याला मिळणार आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी