वडवळ येथील ग्रामपंचायत ही १७ सदस्यांची आहे. येथील ही ग्रामपंचायत ४५ वर्षांपासून जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या ताब्यात होती.
मात्र, यावेळी त्यांच्या पॅनलला ८ जागांवर समाधान मानावे लागले. वटसिद्ध नागनाथ पॅनेलचे ९ उमेदवार विजयी झाले आहेत. वटसिद्ध पॅनेलमधील विजयी उमेदवार- सागर नवने, गणेश कोरे, श्रींमत कांबळे, अमित वाडकर, रेणुका स्वामी, रोहिणी बंगडे, जि.प. सदस्य हर्षवर्धन कसबे, गंगुबाई कसबे, संगीता बनवसकर तर आण्णासाहेब पाटील पॅनलमधील मुरलीधर कांबळे, शेख यासमीन महेबुब, बालाजी गंदगे, महादेव सूर्यवंशी, सिताबाई नवने, पार्वती गजाकोष, अनुसया सूर्यवंशी, मुजीब पटेल हे विजयी झाले
आहेत.
जिल्हा परिषद सदस्य विजयी...
या उपसरपंच वैभव पाटील, महिला आघाडीच्या माया सोरटे, सरपंच पती राजकुमार बेंडके यांना पराभव स्विकारावा लागला. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन कसबे व सोसायटीचे चेअरमन सागर नवने हे विजयी झाले आहे. वटसिद्ध नागनाथ पॅनलच्या विजयी उमेदवारांनी मंदिरात एक संघ राहण्याची शपथ घेतली. यावेळी पॅनल प्रमुख विवेकानंद पाटील, नागनाथ बेंडके आदी उपस्थित होते.