शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजून काढला ४० एकर शेती परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 10:17 IST

लातूर तालुक्यातील बाभळगाव, भुसनी परिसरात रविवारी सकाळी ६.३० वा. च्या सुमारास ये- जा करणाऱ्या काही जणांना बिबट्याचे दर्शन घडल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या शेतात दोन दिवसांपासून शोध मोहीम

लातूर : लातूर शहराजवळील बाभळगाव येथे  पालकमंत्री अमित देशमुख यांच्या ऊस शेतीत रविवारी सकाळी बिबट्याचे ठसे आढळून आले. त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून दोन दिवसापासून शोध मोहीम राबविण्यात येत आहे. मंगळवारी पहाटे ५ वा. पासून ते सकाळी ८ वा. पर्यंत स्थानिक नागरिक, वन्य प्रेमींच्या मदतीने जवळपास ४० एकरचा शेती परिसर पिंजून काढण्यात आला. मात्र, बिबट्या अथवा त्याच्या पाऊल खुणा आढळून आल्या नाहीत.

लातूर तालुक्यातील बाभळगाव, भुसनी परिसरात रविवारी सकाळी ६.३० वा. च्या सुमारास ये- जा करणाऱ्या  काही जणांना बिबट्याचे दर्शन घडल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यावरून तालुका वन परिमंडळ अधिकारी एन.एस. पचरंडे यांच्यासह २० कर्मचारी दाखल झाले. त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता पालकमंत्री अमित देशमुख यांच्या उसाच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. त्यास जेरबंद करण्यासाठी ऊसशेती परिसरात दोन तर बांबू शेतीजवळ एक पिंजरा लावला. विभागीय वन अधिकारी एम.आर. गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी  सी.जी. पोतुलवार, एन.एस. पचरंडे यांनी ड्रोन, ट्रॅप कॅमेऱ्याच्या साह्याने शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्यात बिबट्या आढळून आला नाही. सोमवारी ट्रॅप कॅमेरे आणखीन वाढवून शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्यातही बिबट्याचा वावर आढळून आला नाही.

मंगळवारी पहाटे ५ वा. वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिक व वन्य प्रेमींच्या मदतीने ऊसशेतीसह जवळपास ४० एकराचा परिसर सकाळी ८ वा. पर्यंत पिंजून काढला. मात्र त्यांना बिबट्या अथवा त्याच्या पाउल खुणा आढळून आल्या नाहीत. तसेच ठेवलेले खाद्यही तिथेच होते.

नागरिकांनी घाबरू नये गस्त सुरूच...उसाचा जवळपास दहा ते बारा एकराचा फड आणि परिसरातील शेती मंगळवारी सकाळपर्यंत पिंजून काढली. मात्र बिबट्या आढळून आला नाही. तसेच पिंजऱ्यातील खाद्य तिथेच आहे. याशिवाय परिसरातील कुठल्याही पाळीव प्राण्यावर हल्ला झाल्याचे दिसून आले नाही. आमची सतत गस्त सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन तालुका वन परिमंडळ अधिकारी एन. एस. पचरंडे यांनी केले आहे.

दक्षतेसाठी ट्रॅप कॅमेरे तिथेच...गेल्या ४८ तासांपासून शोध मोहीम सुरू आहे. दक्षता म्हणून ट्रॅप कॅमेरे आणखीन काही दिवस येथेच ठेवले जाणार आहेत. बाभाळगावसह भुसनी व परिसरातील गावांमध्ये गस्त सुरु आहे. नागरिकांनी घाबरू नये. काळजी घ्यावी, असेही पचरंडे म्हणाले.

टॅग्स :leopardबिबट्याlaturलातूरforestजंगल