शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यातील ५०३ गावांतील टंचाई निवारणासाठी ४ कोटींचा कृती आराखडा !

By संदीप शिंदे | Updated: February 21, 2023 19:30 IST

प्रस्तावित उपाययोजना : अधिग्रहणावर होणार सर्वाधिक खर्च

लातूर : फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा पारा वाढत चालला आहे. नदी, नाले कोरेडे पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने संभावित पाणीटंचाई लक्षात घेऊन कृती आराखडा तयार केला आहे. यात जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जुन या दोन टप्प्यात आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ३८४ गावे व ११० वाड्यांना मिळून एकूण ५०३ गाव-तांड्यावर पाणीपुरवठ्यासाठी ४ कोटी १६ लाख ३५ हजार रुपये विविध उपाययाेजनांसाठी खर्च करण्यात येणार आहेत.. या आराखड्यात सर्वाधिक १ कोटी ७७ लाख ७० हजार रुपयांचा खर्च हा खासगी विहीरी व विंधन विहीरीच्या अधिग्रहणासाठी करण्यात येणार आहे. दरवर्षी उन्हाळ्यात काही गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. त्यावर उपाय म्हणून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, मागील दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस होत असल्याने टँकरची आवश्यकता भासली नाही. यावर्षीही तशी शक्यता नाही. मात्र, प्रशासनाकडून खबरदारी म्हणून टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीत ७४ गावे, २९ वाड्यांवर विविध उपाययोजनांसाठी १ कोटी ९४ लाख ७८ हजार रुपये खर्च होणार आहेत. तर एप्रिल ते जून यादरम्यान ३१० गावे, ८१ वाड्या मिळून एकूण ४०० गाव-वाड्यांवर पाणी टंचाई निर्माण झाल्यास २ कोटी २१ लाख ५७ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.

अधिग्रहणासाठी पावणेदोन कोटी...संभावित टंचाई कृती आराखड्यात सर्वाधिक १ कोटी ७७ लाख ७० हजार रुपये अधिग्रहणावर खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय टँकरने पाणीपुरवठा करणे, विंधन विहीरी घेणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहीरीची तात्पुरती दुरुस्ती, पुरक नळ योजना करणे, प्रगतीपथावरील नळ योजना पुर्ण करणे, विहीरीची खोली वाढविणे, गाळ काढणे, बुडक्या घेणे आदी विविध उपाययोजनांवर निधी खर्च केला जाणार आहे.

दोन टप्प्यात होणार अंमलबजावणी...जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला असून, यावर जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून या दोन टप्प्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यास अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात विविध उपाययोजनेतंर्गत नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी १ कोटी ६ लाख, टॅकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी २५ लाख २० हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर