गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या घटत आहे. दिवसाला चारशे ते पाचशे रुग्ण तरीही आढळत आहेत. एक ते दीड हजारांपासून ही संख्या कमी आल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र, आता कोरोनानंतर काहींना म्युकरमायकोसिसचा आजार असल्याचे निदान झाले आहे. अशा ३८ रुग्णांची अधिकृत नोंदणी झाली आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्यूचे प्रमाण आहे तसेच आहे. त्यामुळेही चिंता आहे. त्यात म्युकरमायकोसिसच्या आजाराची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होणार नाही, यादृष्टीने नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमित मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब केला तर रुग्णसंख्या घटण्यास मदत होणार आहे, असेही आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात ३८ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:19 IST