शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

प्रोत्साहन अनुदानाचे ३६९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर !

By संदीप शिंदे | Updated: March 16, 2023 17:58 IST

१ लाख १३ हजार लाभार्थी, ४२५७ जणांची ई-केवायसी रखडली

लातूर : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे. जिल्ह्यात १ लाख ८५ हजार ७४ लाभार्थी असून, यातील १ लाख १३ हजार २०२ लाभार्थ्यांच्या खात्यावर ३६९ कोटी ११ लाखांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे. तर ई-केवायसी केली नसल्याने ४२५७ शेतकरी प्रोत्साहनच्या लाभापासून वंचित आहेत.

तीन वर्षे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यात १ लाख ८५ हजार ७४ लाभार्थी आहेत. यातील १ लाख ३१ हजार ८३० शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक मिळालेला असून, १ लाख २७ हजार ५७३ शेतकऱ्यांनी आधार ई-केवायसी केली आहे. तर ४ हजार २५७ जणांनी ई-केवायसीकडे पाठ फिरविली आहे. पहिल्या यादीत ४८ हजार, दुसऱ्या यादीत ८३ हजार शेतकऱ्यांची नावे आली आहेत. तर तिसरी यादी जाहीर होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाबाबत ७७२ शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या असून, जिल्हास्तरावर २९९ तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. तसचे तहसीलस्तरावर ३११ तक्रारी सोडविण्यात आल्या असून, ८१ तक्रारी रखडलेल्या आहेत. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत २ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्यात आले होते. मात्र, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत देण्यात आली नव्हती. त्यामुळे शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले होते. आता तिसरी यादी जाहीर होणार असून, सर्व प्रक्रिया विशिष्ठ क्रमांकावर सुरु असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले.

ई-केवायसी तातडीने करुन घ्यावी...लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदान जमा होण्यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे. आतापर्यंत १ लाख २७ हजार ५७३ जणांनी ई-केवायसी केली असून, ४ हजार २५७ शेतकऱ्यांनी अद्यापही केवायसी केलेली नाही. त्यामुळे योजनेच्या लाभापासून ते वंचित आहेत. ई-केवायसी केल्यास प्रोत्साहन अनुदानाची रक्कम खात्यावर वर्ग करण्यास मदत होणार आहे. - एस.आर. नाईकवाडी, जिल्हा उपनिबंधक

सव्वा लाख जणांना विशिष्ट क्रमांक...प्रोत्साहन अनुदानाची प्रक्रिया विशिष्ट क्रमांकावरच चालते. शेतकऱ्याचे नाव यादीत आल्यावर विशिष्ट क्रमांक दिला जातो. तो क्रमांक संबधित बँकेत दाखिवल्यावर प्रोत्साहनपोटी मिळणारी रक्कम दर्शविली जाते. त्याबद्दल शेतकऱ्याची तक्रार नसल्यास ही रक्कम खात्यावर वर्ग करण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३१ हजार ८३० जणांना विशिष्ट क्रमांक मिळालेला आहे.

प्रोत्साहन अनुदानाची अशी आहे आकडेवारी...एकूण लाभार्थी - १,८५,०७४विशिष्ट क्रमांक मिळालेले - १,३१,८३०ई-केवायसी झालेले - १,२७,५७३ई-केवायसी रखडलेले - ४,२५७अनुदान मिळालेले - १,१३,२०२अनुदानपोटी रक्कम - ३६९.११ कोटी

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर