शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात ई-पीक पाहणीकडे ३५ टक्के शेतकऱ्यांची पाठ !

By संदीप शिंदे | Updated: March 2, 2023 17:28 IST

दोनवेळा मुदतवाढ देऊनही नोंदणी रखडली

लातूर : शेतातील पिकाची माहिती ऑनलाईन नोंदविता यावी, पिकविमा, नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास शासकीय मदत देण्यासाठी सुसूत्रता यावी, यासाठी शासनाच्यावतीने ई-पीक पाहणीचा उपक्रम राबविण्यात आला होता. नोंदणीसाठी दोनवेळेस मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने जिल्ह्यात केवळ ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर ३५ टक्के शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीच केली नसल्याचे समोर आले आहे.

ई-पीक पाहणीमध्ये शेतकऱ्यांना मोबाईल ॲपद्वारे शेतातील पिकांचा फाेटो काढून अपलोड करावा लागणार होता. त्यानुसार कृषी, महसूल विभागाच्यावतीने जनजागृतीही करण्यात आली होती. जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणीसाठी ३ लाख ३४ हजार ६२ हेक्टर प्रस्तावित होते. यापैकी २ लाख १७ हजार ८०४ हेक्टरवर पीक पाहणी क्षेत्र मंजूर झाले होते. दरम्यान, जिल्ह्यात फेब्रुवारी अखेरपर्यंत ६५.२० टक्केच ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यात ७४ टक्के, उदगीर ७१, औसा ५८, चाकूर ६८, जळकोट ६२, देवणी ७१, निलंगा ५४, रेणापूर ७१, लातूर ६९, तर शिरुर अनंतपाळ तालुक्यात ७७ टक्के क्षेत्रावरील पाहणी पूर्ण झाली आहे.

ॲपद्वारे पिकांची अचूक नोंद...सातबारा उताऱ्यावर दरवर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकाची नोंद तलाठी, मंडल अधिकारी यांच्यातर्फे करण्यात येते. राज्य शासनातर्फे मागील वर्षीपासून ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक नोंदणी उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे प्रत्यक्ष शेतात जाऊन ॲपद्वारे फोटो अपलोड करावा लागत असल्याने पिकांची अचूक नोंद होत आहे. त्यामुळे पिकविमा, शासकीय अनुदान मिळण्यास अडचणी येणार नाही, हा उद्देश या ई-पीक पाहणीचा आहे.

नोंदणीत लातूर तालुका आघाडीवर...ई-पीक पाहणी हा शासनाच्यावतीने राबविण्यात येणारा उपक्रम असून, जनजागृतीसाठी महसूल प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक ई-पीक पाहणी लातूर तालुक्यात ७७.३६ टक्के झाली आहे, तर सर्वात कमी ई-पीक पाहणी निलंगा तालुक्यात झाली आहे. दरम्यान, शासनाकडून पाहणीसाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, तरीही अनेक शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीlaturलातूर