शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ खेळाडूंना पुन्हा २५ वर्षाची अट; कोरोनामुळे दिलेली सवलत खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 19:40 IST

दोन वर्षे स्पर्धा न झाल्याने खेळाडूंचे नुकसान झाले होते. त्याची दखल घेत भारतीय विश्वविद्यालय संघाने खेळाडूंना स्पर्धेसाठी खेळण्यासाठीच्या वयोमर्यादेत वाढ केली होती.

- महेश पाळणेलातूर : कोरोना काळात नुकसान झालेल्या खेळाडूंसाठी भारतीय विश्वविद्यालय संघाने मागील दोन वर्षी वयोमर्यादा वाढविली होती. त्यामुळे खेळाडूंचे नुकसान टळले. आता स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पूर्ववत २५ वर्षांची अट खेळाडूंना लागू करण्यात आली आहे.

कोरोना काळात दोन वर्ष अनेक क्षेत्रांचे नुकसान झाले. त्यात क्रीडाक्षेत्रही होते. दोन वर्षे स्पर्धा न झाल्याने खेळाडूंचे नुकसान झाले होते. त्याची दखल घेत भारतीय विश्वविद्यालय संघाने खेळाडूंना स्पर्धेसाठी खेळण्यासाठीच्या वयोमर्यादेत वाढ केली होती. सन २०२१- २२ या काळात वयोमर्यादा २५ वरून २६ वर्षे अशी करण्यात आली होती. त्यानंतर सन २०२२- २३ साठी वयोमर्यादा २७ वर्ष करण्यात आली होती. त्यामुळे खेळाडूंचे दोन वर्षांचे नुकसान भरून निघाले. त्यानंतर आता यंदाच्या अकॅडमिक वर्षात खेळाडूंना स्पर्धेत भाग घेण्याची अट पूर्वीप्रमाणेच २५ वर्षे करण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक भारतीय विश्वविद्यालय संघाने सर्व कुलगुरूंना पाठविले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना २५ वर्षाची वयोमर्यादा कायम राहणार आहे. सन २०२०- २१ साली आंतर विद्यापीठ व क्रीडा महोत्सव ही स्पर्धा झाली नाही, तर २०२१- २२ काळात काही खेळांच्या स्पर्धा आंतर विद्यापीठ स्तरावर झाल्या. मात्र क्रीडा महोत्सव या वर्षात झाला नाही.

कमीत कमी वय १७ वर्षे...विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे कमीत कमी वय १७ वर्षे पूर्ण आवश्यक आहे व जास्तीत जास्त वय २५ वर्षे असणे गरजेचे आहे. आंतर विद्यापीठ स्पर्धेच्या दिवशी त्याने १७ वर्षे पूर्ण केलेले असावे. तसेच २५ वर्षाची वयोमर्यादा त्या-त्या वर्षी १ जुलैपर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे.

पूर्वीप्रमाणेच वयाची अट...यंदाच्या आंतर महाविद्यालयीन व आंतर विद्यापीठ स्पर्धेत खेळाडूंची वयोमर्यादा २५ वर्ष राहणार आहे. त्यामुळे विद्यापीठातील सर्व महाविद्यालय व खेळाडूंनी त्याची नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणेच खेळाडूंना सहभागी करून घ्यावे.- प्रा. डॉ. मनोज रेड्डी, क्रीडा संचालक, स्वारातीम विद्यापीठ, नांदेड.

टॅग्स :laturलातूरuniversityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र