शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गावच्या विकासास मिळणार चालना, लातूरातील ७८५ ग्रामपंचायतींसाठी २१ कोटींचे अनुदान

By हरी मोकाशे | Updated: March 4, 2024 18:44 IST

१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत अबंधित निधी

लातूर : गावागावातील ग्रामपंचायतस्तरावरील स्थानिक गरजा पूर्ण करुन नागरिकांना सेवा- सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत जिल्ह्यातील ७८५ ग्रामपंचायतींसाठी २० कोटी ९६ लाख ३४ हजारांचा अबंधित निधी केंद्र शासनाने उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायती मालमाल झाल्या असून गावच्या विकासास आणखीन चालना मिळणार आहे.

राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार एप्रिल २०२० पासून केंद्र शासनाकडून बंधित आणि अबंधित अशा दोन स्वरुपात निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. यात ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी प्रत्येकी १० टक्के निधी देण्यात येतो. बंधितसाठी ६० टक्के तर अंबधितसाठी ४० टक्के निधी दिला जातो. बंधित अनुदानाचा वापर स्वच्छता आणि हागणदारीमुक्त गाव, पाणीपुरवठा, जल पुर्नभरणसाठी तर अंबधितचा उपयोग ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन व अस्थापनाविषयीच्या बाबी वगळून इतर स्थानिक गरजांनुसार आवश्यक बाबींवर वापरता येतो. शिवाय, एकूण अनुदानाच्या २५ टक्के रक्कम आरोग्य, शिक्षण, उपजिविका, महिला व बालकल्याण, अनु. जाती व जमातीच्या घटकावर लोकसंख्येच्या प्रमाणात खर्च करणे आवश्यक आहे.

अबंधित निधीचा दुसरा हप्ता...१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज संस्थांना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अबंधित निधीच्या दुसऱ्या हप्त्यापोटील जिल्ह्यातील ७८५ ग्रामपंचायतींना २० कोटी ९६ लाख ३४ हजार रुपये केंद्र शासनाने उपलब्ध करुन दिले आहेत.

यापूर्वी ३६६ कोटींचा निधी...ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि प्रत्येक गावचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत १ एप्रिल २०२० पासून ३ मार्च २०२४ पर्यंत ३६६ कोटी १९ लाख ७१ हजार १६० रुपयांचा निधी मिळाला आहे. आता सोमवारी २० कोटी ९६ लाख ३४ हजारांचा निधी मिळाला आहे.

प्रशासकांमुळे निधीवर पाणी...जिल्हा परिषद आणि पंचायत समितीस प्रत्येकी १० टक्के निधी देण्यात येतो. दरम्यान, दोन वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर प्रशासकराज आहे. त्यामुळे सन २०२२-२३ आणि २०२३- २४ या दाेन वर्षांतील अबंधितचे चार आणि बंधितचे चार हप्ते जमा करण्यात आले नाहीत. दाेन वर्षांपासून ग्रामपंचायतींस निधी दिला जात आहे.

वेळेत खर्च करावा...अबंधित निधीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम सोमवारी उपलब्ध झाली आहे. ती प्रत्येक ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा करणे सुरु आहे. ग्रामपंचायतींनी आराखड्यानुसार वेळेवर निधीचा वापर करावा.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतlaturलातूर