शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

२०८ उमेदवारांचे भविष्य सीलबंद! लातूर जिल्ह्यातील चार नगर पंचायतींसाठी शांततेत मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 19:37 IST

येथे एकूण ७६.८५ टक्के मतदान झाले असून, आता निकालाची उत्सुकता लागली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे १६ जागांवर निवडणूक झाली नाही. या जागांवर १८ जानेवारीला निवडणूक होणार असल्याने सर्वच मतमोजणी १९ जानेवारीला होणार असल्याचे निवडणूक विभागातून सांगण्यात आले.

लातूर- जिल्ह्यातील चाकूर, जळकोट, देवणी आणि शिरूर अनंतपाळ या चार नगरपंचायतींच्या ५२ जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी २०८ उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी ६२ मतदान केंद्रांवर मंगळवारी शांततेत मतदान झाले. एकूण २५ हजार २१३ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात १३ हजार ३२४ पुरुष मतदार तर ११ हजार ८८९ महिला मतदारांचा समावेश आहे. 

येथे एकूण ७६.८५ टक्के मतदान झाले असून, आता निकालाची उत्सुकता लागली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे १६ जागांवर निवडणूक झाली नाही. या जागांवर १८ जानेवारीला निवडणूक होणार असल्याने सर्वच मतमोजणी १९ जानेवारीला होणार असल्याचे निवडणूक विभागातून सांगण्यात आले.

जळकोट नगरपंचायतीसाठी ८१.९१ टक्के मतदान -जळकोट नगरपंचायतीच्या एकूण १३ जागांसाठी ५२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यासाठी १३ केंद्रांवर मंगळवारी मतदान झाले. ६ हजार १०८ मतदारांपैकी ५ हजार ०३ मतदारांनी या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यात २ हजार ६६१ पुरुष तर २ हजार ३४२ स्त्री मतदारांचा समावेश आहे. पुरुष मतदारांच्या मतदानाची टक्केवारी ८३.०५ तर महिला मतदारांच्या मतदानाची ८०.६५ टक्के आहे.

चाकूर नगरपंचायतीत ९१९९ मतदारांनी बजावला हक्क -चाकूर नगरपंचायतीच्या एकूण १३ जागांसाठी ५८ उमेदवार रिंगणात होते. २३ मतदान केंद्रांवर ९१९९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात ४८९४ पुरुष मतदार तर ४३०५ महिला मतदारांचा समावेश आहे. ७४.८४ टक्के पुरुष मतदारांनी तर ७४.६७ टक्के महिला मतदारांनी मतदान केले. एकूण ७४.७६ टक्के मतदान चाकूर नगरपंचायतीसाठी झाले.

देवणीत ६६ मतदान केंद्रांवर मतदान -देवणी नगरपंचायतीत एकूण १३ जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक झाली असून, १३ जागांसाठी १३ मतदान केंद्रांवर ६६ उमेदवारांसाठी मतदान झाले. ८४९६ मतदारांपैकी ६०७४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात ३२०७ पुरुष तर २८६७ महिला मतदारांचा समावेश आहे. या नगरपंचायतीत एकूण ७१.४९ टक्के मतदान झाले. सकाळी ७.३० वाजेपासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शांततेत मतदान झाले.

शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीसाठी ३२ उमेदवार -शिरूर अनंतपाळ नगरपंचायतींच्या १३ जागांसाठी ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. १३ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया मंगळवारी शांततेत झाली. ६१९९ मतदारांपैकी ४९३७ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात २५६२ पुरुष तर २३७५ महिला मतदारांचा समावेश होता. एकूण ७९.६४ टक्के मतदान या नगरपंचायतीसाठी झाले. 

टॅग्स :Electionनिवडणूकpanchayat samitiपंचायत समितीlaturलातूर