शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात पहाटे २ फ्लॅट फोडले; पाच लाखांचे दागिने पळविले !

By राजकुमार जोंधळे | Updated: August 9, 2023 05:23 IST

जिल्हाभरात घरफाेड्यांच्या घटनामध्ये वाढ  

लातूर : शहरातील बार्शी राेडवर असलेल्या एका अपार्टमेंटमधील दाेन फ्लॅट भल्या पहाटे फाेडून चाेरट्यांनी तब्बल पाच लाखांचा ऐवज पळविल्याची घटना घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी राजेश रतनलाल तोष्णीवाल (रा. रतलाम मध्य प्रदेश, ह.मु. चैतन्य अपार्टमेंट, बार्शी रोड, लातूर) हे सध्याला बार्शी राेडवरील चैतन्य अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांच्या फ्लॅटचा अज्ञात चाेरट्यांनी कडीकोंडा तोडून प्रवेश केला. घरात ठेवण्यात आलेले ४ लाख ५१ हजार १६३ रुपयांचे साहित्य, त्याचबराेबर याच अपार्टमेंटमध्ये शेजारी राहणाऱ्या एकाच्या फ्लॅटमधील ४० हजारांची राेकड असा एकूण जवळपास ४ लाख ९१ हजार १६३ रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे.

यामध्ये साेन्याच्या बांगड्या, पेंडल, लेडिज रिंग, चेन आणि रोख रक्कम असा हा मुद्देमाल असल्याचे फिर्यादी राजेश तोष्णीवाल यांनी एमआयडीसी ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. घटनास्थळी पाेलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप कराड करत आहेत.