लातूर जिल्ह्यामध्ये ४०८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, या निवडणुकीसाठी ३ हजार ३७५ जागांसाठी एकूण ९ हजार ३३८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या सर्व उमेदवारांना ४ जानेवारी रोजी चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. एका उमेदवाराला १९० चिन्हांमधून ५ चिन्हांपैकी एका चिन्हाची निवड करावी लागणार आहे. निवडलेल्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पूर्वी १५० चिन्हे दिली जात होती. आता त्यात ४० ने वाढ झाली असून, १९० चिन्हांतून आता उमेदवारांना चिन्हांची निवड करता येणार आहे. जेवणाची थाळी, उशी, फोन चार्जर, शाॅपनर, वाटाणे, गळ्यातील टाय, भुईमूग, पेन स्टँड, कम्पास पेटी, ज्युडो, साबण, पाटी आदी नवे चिन्हे यंदा आली आहेत. या चिन्हांतून उमेदवारांना आता एका चिन्हाची निवड करून मतदारांत ११ दिवसांत पोहोचायचे आहे.
अशी आहेत चिन्ह
एअर कंडिशनर, कपाट, सफरचंद, ऑटो रिक्षा, पांगुळगाडा, फुगा, टोपली, बॅट, फलंदाज, विजेरी (टाॅर्च), मण्यांचा हार, पट्टा, बाकडे, सायकल पंप, दुर्बीण, बिस्कीट, फळा, होडी, पुस्तक, पेटी, ब्रेड टोस्टर.
n पाव, विटा, ब्रिफकेस, ब्रश, बादली, बस, केक, गणकयंत्र, कॅमेरा, कॅन, मेणबत्ती, ढोबळी मिरची, गालिचा, कॅरम बोर्ड, खटारा, फुलकोबी, सीसीटीव्ही कॅमेरा, छताचा पंखा, साखळी, जाते, पोळपाट, लाटणे, बुद्धिबळ, चिमणी, चिमटी/क्लिप, कोट, नारळाची बाग, नारळ, रंगाचा ट्रे व कंगवा, संगणकाचा माऊस, संगणक, क्रेन, घनठोकळा, कप-बशी, हिरा, पेन ड्राइव्ह, चार्जर, आक्रोड, विहीर या नवीन चिन्हांची पडली भर पडली आहे.
n स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पूर्वी १५० चिन्हे दिली जात होती. या चिन्हांतील पाच पर्याय दिले जात असत. त्यापैकी एक चिन्ह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सहमतीने मिळत असे.
n यंदा ४० चिन्हांची भर पडली आहे. एकूण १९० चिन्हे आहेत. नव्या चिन्हांमध्ये सूप, गुंडा, विहीर, कलिंगड, आक्रोड, पाकीट, वाॅल हूक, टायर्स, बिगुल, दातांची पेस्ट, ब्रश, तंबू, भाला फेकणारा, चहाची गाळणी, टीव्ही रिमोट, इंजेक्शन, झोका, स्टॅम्प, स्टेथस्कोप, चार्जर, शाॅपनर, जेवणाची थाळी, वाटाणे, गळ्यातील टाय, भुईमूग, पेन स्टँड, कंपास पेटी आदी नवी चिन्हे आली आहेत.
जिल्ह्यात ४०८ ग्रामपंचायतींसाठी १० हजार ११४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १२९ जणांचे अर्ज अवैध ठरले आहेत. उर्वरित ९ हजार ९३८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून, उमेदवारांना ४ जानेवारी रोजी चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. एकाला ५ चिन्हांतून एका चिन्हाची निवड करावी लागेल.
- गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन