शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

लातूर जिल्ह्यात १९ हजार बालके विविध आजारांनी ग्रस्त; आरोग्य तपासणीत पुढे आली माहिती

By संदीप शिंदे | Updated: April 6, 2023 17:12 IST

जागरूक पालक-सुदृढ बालक अभियान : ७१ बालकांवर होणार शस्त्रक्रिया

लातूर : आरोग्य विभागाच्यावतीने शून्य ते अठरा वर्षे वयोगटांतील बालकांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी जागरूक पालक-सुदृढ बालक अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत आतापर्यंत ० ते ६ वयोगटातील १ लाख ३७ हजार ९०० आणि ६ ते १८ वयोगटातील ३ लाख ५४ हजार ७७ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये १९ हजार ४९५ बालके विविध आजारांनी ग्रस्त असल्याचे आढळले असून, यातील ७१ जणांना शस्त्रक्रियेकरिता संदर्भित करण्यात आले आहे.

बालकांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी जागरूक पालक-सुदृढ बालक अभियान जिल्ह्यात ९ फेब्रुवारीपासून राबविण्यात येत आहे. शाळा, अंगणवाडीमधील एकूण ५ लाख ५८ हजार १८२ बालकांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये रक्तक्षय, दृष्टिदोष, त्वचा, दातासंबधी आजार, जीवनसत्त्वाची कमतरता, स्वमग्नता, जन्मजात हृदयरोग, कानासंबधी आजार, दुभंगलेले ओठासह कुपोषण आदी आजारांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., सीईओ अभिनव गोयल यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. हणमंत वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख, जिल्हा माता व बाल संगोपण अधिकारी सतीष हरिदास यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेमुळे बालकांच्या आजाराचे लवकर निदान झाले असून, व्याधीग्रस्त बालकांना उपचार घेऊन लवकर बरे होण्यास मदत होणार आहे.

तालुकानिहाय असे आहेत आजार बालके...अहमदपूर तालुक्यात ३००९, औसा २७३८, चाकूर ८०८, देवणी १८८२, जळकोट ७३९, लातूर १९१३, निलंगा ३७५३, रेणापूर ९९६, शिरुर अनंतपाळ ८४८ तर उदगीर तालुक्यातील ३००९ बालके विविध आजारांनी ग्रस्त असल्याचे आढळून आले आहेत. दरम्यान, यातील ७१ बालकांना शस्त्रक्रियेकरिता ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय स्तरावर संदर्भित करण्यात आले आहे.

साडेपाच लाख बालकांची तपासणी...जागरूक पालक-सुदृढ बालक अभियानांतर्गत ५ लाख ५८ हजार १८२ बालकांची तपासणीचे उद्दीष्ट होते. त्यानुसार ० ते ६ वयोगटातील १ लाख ३७ हजार ९०० आणि ६ ते १८ वयोगटातील ३ लाख ५४ हजार ७७ लाभार्थींची तपासणी करण्यात आली आहे. ९ फेब्रुवारीपासून हे अभियान सुरू असून, ३४३४ अंगणवाड्या आणि २२५१ शाळांमध्ये हे अभियान राबविण्यात आले.

आजार आढळलेल्या बालकांवर औषधोपचार...शाळा, अंगणवाडीमध्ये जागरूक पालक-सुदृढ बालक अभियानांतर्गत आरोग्य तपासणी करण्यात आली. अभियानांतर्गत ज्या बालकांना शस्त्रक्रियेची गरज होती त्यांना संदर्भित करण्यात आले. तर इतरांवर औषधोपचार करण्यात आले. मोहीमेमुळे बालकांच्या आजाराचे निदान झाले असून, आजार लवकर बरा होण्यास मदत होणार आहे. अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा डाटाबेस तयार झाला आहे. - डॉ. हणमंत वडगावे, जिल्हा आरोग्याधिकारी

आजार आणि ग्रस्त बालकांची संख्या...आजार बाधित बालकेरक्तक्षय १५२२दृष्टिदोष २५९७त्वचेसंबधी आजार १२७१दातासंबधी आजार ४३५०जीवनसत्त्व कमतरता १७९९स्वमग्नता १८६जन्मत: हृदयरोग ९२दुभंगलेले ओठ २४कानाचे आजार ४२८कुपोषित ५३४

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषदEducationशिक्षण