शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

लातूरातील १३ शाळा ‘पीएम-श्री’ योजनेत; अनुभवात्मक पद्धतीने मिळणार भविष्यवेधी शिक्षण

By संदीप शिंदे | Updated: March 31, 2023 18:04 IST

‘पीएम-श्री’ योजनेंतर्गत शाळांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.

लातूर : राज्य शासनाने पीएम श्री योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील १३ शाळांना मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून या शाळांचा आदर्श शाळा म्हणून विकास होणार असून, पाच वर्षांसाठी या शाळांना पावनेदोन कोटी रुपये मिळणार आहेत.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रधानमंत्री स्कूल्स फॉर राइझिंग इंडिया अर्थात ‘पीएम-श्री’ योजनेंतर्गत शाळांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. याअंतर्गत उच्च दर्जाचे गुणात्मक अन् भविष्यवेधी शिक्षण देण्यासाठी जिल्ह्यातील २५२ शाळांची निवड करण्यात आली आहे. या योजनेतून शाळा सर्वोत्कृष्ट ठरविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. विशेषत: निवड झालेल्या प्रत्येक शाळेस १ कोटी ८८ लाख रुपयांची तरतूद पाच वर्षांसाठी करण्यात येणार असून, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या शाळांमध्ये केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १३ शाळांची निवड करण्यात आली असून, याबाबतची यादी शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. राज्याकडुन सुचना मिळताच या योजनेची अंमलबजावणी होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

केंद्र आणि राज्य शासन उचलणार खर्च....पीएम श्री योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाने केंद्रासोबत करार केला असून, करारानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार आहे. योजनेत केंद्राचा ६० टक्के तर राज्याचा ४० टक्के वाटा राहील. प्रत्येक शाळेसाठी १ कोटी ८८ लाख रुपयांची तरतूद पाच वर्षांसाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे निवड झालेल्या शाळांचा सर्वांगीण विकास होणार असून, विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही शिक्षण मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार आनंददायी शिक्षण...निवड झालेल्या या शाळांमधून विद्यार्थ्यांना अनुभवात्मक पद्धतीने आनंददायी शिक्षण देण्यात येईल. वैचारिक समज आणि जीवनातील त्याचा ज्ञानाचा वापर आणि योग्यतेवर आधारित मूल्यांकन होईल. शाळांचा भौतिक विकास होणार असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १३ शाळांची निवड झाली आहे. दरम्यान, राज्य आणि केंद्र शासनाकडून सुचना मिळताच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणlaturलातूरzp schoolजिल्हा परिषद शाळा