सभेला महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त अमन मित्तल तर ऑनलाईनच्या माध्यमातून सभागृह नेते ॲड. शैलेश गोजमगुंडे, विरोधी पक्षनेते ॲड. दीपक सूळ, सहायक आयुक्त सुंदर बोंदर उपस्थित होते.
प्रत्येक सदस्यांसाठी एक अधिकारी
सर्वसधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. दरम्यान, सदस्यांना तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून मनपाने स्वतंत्रपणे एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. शासनाच्या निर्देशानुसार सभा ऑनलाईन घेण्यात आली.
रिक्त पदांवर नियुक्त्या
स्थायी समितीच्या एका रिक्त जागेसाठी भाजपाकडून जान्हवी सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली. परिवहन समितीचे सदस्य म्हणून काँग्रेसचे संजय सूर्यवंशी, सचिन गंगावणे, नामदेव इगवे, कलिम शेख तर भाजपाकडून नगरसेवक तुळशीराम दुडिले, सरिता राजगिरे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले.
ऑनलाईन सभेतही गोंधळ
ऑनलाईन सभेला तांत्रिक अडचण उद्भवू नये म्हणून मनपाने प्रति सदस्यांसाठी एक अधिकारी दिला असला तरी आवाज येत नाही, व्हिडिओ गायब होत आहे, बोलणेच ऐकू येत नाही, अशा तक्रारी विरोधी सदस्यांनी केल्या. सभागृह नेते ॲड. शैलेश गोजमगुंडे, रागिणी यादव यांनी हे गाऱ्हाणे मांडले. एवढ्या मोठ्या विषयांसाठी ऑफलाईन सभा घ्यायला हवी होती, असे म्हणणे त्यांनी मांडले.