अहमदपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत येथील ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमधून गंभीर १०५ रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे घेऊन घरी गेले आहेत. तेथील डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा दिल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांतून समाधान व्यक्त होत आहे.
अहमदपूर तालुक्यात मार्चपासून एप्रिल अखेरपर्यंत कोरोनाचा संसर्ग वाढला होता. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एप्रिलमध्ये बाधित रुग्ण वाढत राहिल्यामुळे गंभीर रुग्णांची संख्याही वाढली होती. त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयात डीसीएचसी सेंटर निर्माण करुन गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजनयुक्त २० खाटा तयार करण्यात आल्या. त्यात तीन बायपॅप मशीन, एक व्हेंटिलेटर, ८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा उपलब्ध आहे. आतापर्यंत तेथून १०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
त्या केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. जयप्रकाश केंद्रे व डॉ. धीरज देशमुख हे असून डॉ. सुरजमल सिहांते, डॉ. नाथराव कराड, डॉ. अमृत चिवडे, डॉ. मणकर्णा पाटील, डॉ. तुषार पवार, डॉ. प्रमोद वट्टमवार, डॉ. मधुसूदन चेरेकर, डॉ. अंकिता कुलकर्णी, डॉ. राजेश्वरी सोळंके, डॉ. सुमया शेख, डॉ. शुभांगी सुडे, डॉ. बाळासाहेब मुंडे हे काम पाहत आहेत. त्यांना वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार मार्गदर्शन करीत आहेत.
सध्या तीन जणांवर उपचार...
येथील सेंटरमध्ये १० एप्रिलपासून आतापर्यंत गंभीर असे एकूण ११८ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले होते. त्यातील १०५ जण बरे झाले. उपचारादरम्यान १० जणांचा मृत्यू झाला. सध्या तिघांवर उपचार सुुरू असून तिन्ही रुग्णांच्या तब्येतीची सुधारणा झाली आहे.
कर्मचाऱ्यांचेही योगदान...
केंद्रातील डॉक्टरांना अनिकेत काशीकर, अजय देशमुख, गणेश सूर्यवंशी, बाबू पठाण, गजानन पदातुरे, सतीश पाटील, जियाऊल मुनसी, शुभांगी खसे, परिसेविका सी. कातोरे, पी.पी. पाटील, सुनील कुंटे, सुनीता पारधी, सुनीता राजे, अनिता कांदे, कावेरी परतवाघ, वर्षा मुंडे, शुभांगी येरमे, अनिता ढाके, अंजली मिटकरी, शरद वाघमारे, अंतेश्वर सिमेंटवाड, ज्योती गुळवे, प्रतीक्षा वाघमारे, सेवक बसवराज लोहारे, राम घोटमुकले, विक्रम गायकवाड, पवन पित्तलवाड, वामन चव्हाण, शिवाजी पुरी यांनी मदत केली.
प्रत्येकावर जबाबदारी...
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, सर्वांनी नियमांचे पालन करावे. प्रत्येकाने जबाबदारीने वागल्यास आपण कोरोनावर मात करु शकतो, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार म्हणाले.