शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सीद्वारे कोट्यवधींचा गंडा; तीन अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 05:10 IST

झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या रकमेचा फायदा करून देतो

कोल्हापूर : झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या रकमेचा फायदा करून देतो, असे आमिष दाखवून महाराष्टÑासह कर्नाटकातील चारशेपेक्षा जास्त गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या तिघा भामट्यांना सोमवारी कोल्हापूर पोलिसांनी अटक केली.संशयित राजेंद्र भीमराव नेर्लेकर (वय ४१), त्याचा भाऊ अनिल (४६, दोघे, रा. हुपरी, ता. हातकणंगले), संजय तमन्ना कुंभार (४२, रा. शिरढोण, ता. शिरोळ) अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यातील मुख्य सूत्रधार बालाजी गणगे (रा. पुणे) हा पसार असून त्याचा शोध सुरू आहे. आतापर्यंतच्या चौकशीमध्ये फसवणुकीची रक्कम २५ कोटींपेक्षा जास्त असल्याचे पुढे आले आहे.नेर्लेकर, कुंभार, गणगे यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये भागीदारीमध्ये ‘झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सी’ ही डिजीटल कंपनी काढली. तिचे कार्यालय लक्ष्मीपुरी कोंडा ओळ (कोल्हापूर) येथे सुरू केले. या कंपनीची आॅनलाईन जाहिरात मोठ्या प्रमाणात करून गुंतवणूकदारांना महिन्याला पंधरा टक्के लाभांश बीट क्वॉईनच्या रूपात देतो, असे आमिष दाखवून दहा हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत महाराष्टÑासह कर्नाटकातील गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले.गुंतवणूकदारांचे आॅनलाईन वॉलेट तयार करून त्याद्वारे बाळासाहेब लक्ष्मण झालटे (४०, रा. शिवाजी पार्क, कोल्हापूर) व त्यांच्या मित्रांकडून २९ लाख ५० हजार रुपये गुंतवणुकीसाठी घेतले. गेल्या सात महिन्यांत ४०० पेक्षा जास्त जणांकडून अशाप्रकारे कोट्यवधी रुपये उकळले. गेल्या महिन्याभरापासून त्यांनी कंपनीच बंद केली. आॅनलाईन व्यवहारही बंद झाल्याने गुंतवणूकदार हादरून गेले. त्यांनी संशयितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते टाळाटाळ करू लागले.आपण गुंतविलेल्या पैशांचा संशयितांनी स्वत:च्या फायद्यासाठी वापर केल्याचे समजताच झालटे यांनी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेतली.त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार दिली. सुमारे ७० पेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी सोमवारी पोलीस मुख्यालयात गर्दी केली होती.घरासह कार्यालयाची झडतीसंशयित नेर्लेकर यांच्या हुपरी येथील घराची आणि कुंभार याच्या कोंडा ओळ चौकातील कार्यालयाची पोलिसांनी झडती घेतली. घरातील बँक खात्यांची पासबुके, काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली. कार्यालयातील संगणक, त्याचा डाटा, स्कॅनर, प्रिंटर जप्त करून कर्मचाºयांचे जबाब घेतले.