शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

जि.प. सदस्यांची दोघांनाही समान ‘ताकद’; २१ महाडिकांना, तर २० सदस्य मंडलिकांना मानणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:44 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकसभा, विधानसभा निवडणुकीची बांधणी करण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची ताकद महत्त्वपूर्ण ठरते. ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लोकसभा, विधानसभा निवडणुकीची बांधणी करण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची ताकद महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळेच जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील सदस्यांचे बळ कोणाच्या मागे अधिक आहे, त्यावरच प्रचाराची यंत्रणा गतिमान होते.सध्याचे बलाबल पाहिले तर कोल्हापूर मतदारसंघातील ४१ जिल्हा परिषद सदस्यांपैकी २१ सदस्य धनंजय महाडिक, तर २० सदस्य प्रा. संजय मंडलिक यांना मानणारे असल्याने येथे काट्याची टक्कर पाहावयास मिळेल. ‘हातकणंगले’मधील ८ सदस्य खासदार राजू शेट्टी यांना, तर तब्बल १८ सदस्य धैर्यशील माने यांच्या प्रचारात सक्रिय होतील. कागदावर हे बलाबल दिसत असले तरी स्थानिक राजकारणावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहणार आहेत.लोकसभा मतदारसंघाचा पसारा फार मोठा आहे. सहा विधानसभेचे मतदारसंघ आणि १९ लाख मतदार संख्या आहे. एवढ्या मोठ्या मतदारसंघात प्रत्येक गाव फिरायचे म्हटले तर उमेदवाराला शक्यच होत नाही. त्यासाठी स्थानिक पातळीवर ज्या उमेदवाराचे संपर्क जाळे मजबूत त्याचे विजयाचे गणित अधिक सोपे राहते, हा आतापर्यंतचा इतिहास आहे.कोल्हापूर मतदारसंघातील काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीकडून खासदार धनंजय महाडिक, तर शिवसेना-भाजप युतीकडून प्रा. संजय मंडलिक रिंगणात आहेत. हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी आघाडीकडून खासदार राजू शेट्टी व शिवसेना-भाजप युतीकडून धैर्यशील माने यांच्यात लढत होत आहे. दोन्ही मतदारसंघांत काट्याची टक्कर पाहावयास मिळणार आहे. जिल्हा परिषद सदस्यांचा पाठिंबा कोणाला राहणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.कोल्हापूर मतदारसंघात जिल्हा परिषदेचे ४१ मतदारसंघ येतात. येथील पक्षीय बलाबल पाहिले तर दोन्ही कॉँग्रेसचे २३ सदस्य, शिवसेना-भाजपचे १४, तर उर्वरित स्थानिक आघाड्या व अपक्ष आहेत. तसे येथे दोन्ही कॉँग्रेसची ताकद अधिक आहे, पण अंतर्गत राजकारणामुळे आमदार सतेज पाटील यांना मानणाऱ्या ६ सदस्यांची भूमिका आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विरोधात राहील. दुसºया बाजूला भाजपच्या ६ सदस्यांपैकी बहुतांशी महाडिक यांनाच मदत करतील, असे चित्र आहे. त्याचबरोबर ताराराणी आघाडीचे बळ महाडिक यांना मिळणार आहे. तरीही ४१ पैकी २० सदस्य हे प्रा. मंडलिक यांना मदत करण्याची शक्यता आहे. दोन्हीकडून जिल्हा परिषदेची यंत्रणा सक्रिय झाली, तर येथे काट्याची टक्कर पाहावयास मिळणार आहे.हातकणंगले मतदारसंघात पन्हाळा व शाहूवाडीतील प्रत्येकी ४, हातकणंगलेतील ११, तर शिरोळमधील ७ सदस्यांचा समावेश होतो. येथील बलाबल पाहिले तर शिवसेना-भाजपची संख्या लक्षणीय आहे. माजी मंत्री विनय कोरे हे युतीसोबत राहिले तर धैर्यशील माने यांच्या बाजूने १८, तर राजू शेट्टी यांच्या प्रचारात ८ सदस्य सक्रिय होतील.कागदावर बलाबल दिसत असले तरी स्थानिक राजकारणावर बºयाच गोष्टी अवलंबून राहणार आहेत. कबनूरच्या विजया पाटील वगळता हातकणंगले, शिरोळचे भाजपचे सदस्य हे पूर्वाश्रमीचे कॉँग्रेस, राष्टÑवादीचे कार्यकर्ते होते. विधानसभा तोंडावर असल्याने शिवसेना-भाजपचे आमदार व सदस्य किती ताकदीने राबणार यावरच येथे तुल्यबळ लढत अवलंबून आहे.अशी मिळणार सदस्यांची ताकदतालुका धनंजय संजयमहाडिक मंडलिककरवीर ५ ६पन्हाळा ० २गगनबावडा ० २राधानगरी ४ १भुदरगड २ २कागल ३ २चंदगड ३ १गडहिंग्लज ३ २आजरा १ २एकूण २१ २०