शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

जिल्हा परिषद राबविणार ‘दिव्यांग उन्नती अभियान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:41 IST

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेने ‘दिव्यांग उन्नती अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांची नोंदणी, सविस्तर माहितीचे संकलन आणि त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध यंत्रणा राबविण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात येणार आहे.सध्या समाजकल्याण विभागाच्या वार्षिक तीन टक्के निधीतून दिव्यांगांसाठीच्या योजना सुरू आहेत; ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेने ‘दिव्यांग उन्नती अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांची नोंदणी, सविस्तर माहितीचे संकलन आणि त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध यंत्रणा राबविण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात येणार आहे.सध्या समाजकल्याण विभागाच्या वार्षिक तीन टक्के निधीतून दिव्यांगांसाठीच्या योजना सुरू आहेत; परंतु जिल्'ातील दिव्यांगांंची परिपूर्ण अशी माहिती जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नाही. त्यांना ओळखपत्र देण्यापासून अनेक अडचणी निर्माण होत असताना, या सर्वांना सोप्या पद्धतीने सुविधा मिळाव्यात, यासाठी हे अभियान कार्य करणार आहे.हे अभियान चार टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सर्व दिव्यांग व्यक्तींची १00 टक्के नोंदणी करून ती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात दिव्यांगत्व प्रमाणपत्र नसलेल्या लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना दिव्यांगत्व प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.तिसºया टप्प्यात दिव्यांगांसाठीची उपकरणे त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी तपासणी शिबिरे घेतली जाणार आहेत. चौथ्या टप्प्यामध्ये आरोग्य तपासणी करून संदर्भ सेवा, उपचार करणे, स्वावलंबन कार्ड दिले जाणार असून शासकीय योजनांचे मेळावे घेतले जाणार आहेत. तसेच जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर कार्यशाळाही घेण्यात येणार आहेत.२१ प्रकारच्या दिव्यांगत्वाचा समावेशया योजनेतून २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना लाभ दिला जाणार आहे. शासनाच्या जुन्या नियमानुसार अंध, बहिरे, मुके, हात, पायाने दिव्यांग, स्वमग्न अशा काही मोजक्या वर्गांतील दिव्यांगांचा समावेश केला जात असे. मात्र, आता केंद्र शासनाने नव्याने काही प्रकारांचा समावेश केल्याने त्याची दखल या योजनेमध्ये घेण्यात आली आहे. त्यानुसार पूर्णत: अंध, अंशत: अंध, कर्णबधिर, वाचादोष, अस्थिव्यंग, मानसिक आजार, अध्ययन अक्षम, मेंदूचा पक्षाघात, स्वमग्न, बहुविकलांग, कुष्ठरोग, बुटकेपणा, बौद्धिक अक्षमता, मांसपेशीय क्षरण, मज्जासंस्थेचे तीव्र आजार, मल्टिपल स्केलेरोसिस, थॅल्सेमिया, अधिक रक्तस्राव, सिकल सेल, अ‍ॅसिड अटॅक, कंपवात रोग हे प्रकार यामध्ये समाविष्ट आहेत.रविकांत अडसूळ यांचा पुढाकारनव्यानेच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालेले रविकांत अडसूळ यांनी ही योजना तयार करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. त्यांनी पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना ही योजना सादर केली. त्यांच्या या संकल्पनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी कौतुक केले आहे.२१ जणांची समितीया अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली २१ सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष, सर्व विषयसमित्यांचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिष्ठाता- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, तहसीलदार संजय गांधी योजना, व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बॅँक, आगारप्रमुख एस. टी., महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक, दिव्यांग संघटनांचे दोन प्रतिनिधी, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी हे सदस्य म्हणून राहणार आहेत; तर जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. समन्वयक म्हणून सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी काम पाहतील.